धनुरासन
धनुरासन केल्याने ओटीपोटावर दबाव येतो. त्यामुळे पोटाभोवतालची अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. यामुळे शरीरही डिटॉक्स होतं. यामुळे चेहरा आणि ओटीपोटात रक्त प्रवाह देखील वाढतो. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
advertisement
पश्चिमोत्तानासन
या योगासनात पाठीचा कणा, खांदे आणि मांडीच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे पाठीच्या खालच्या भागातला ताण कमी होतो, ज्यामुळे पचन सुधारतं. जेव्हा पचन सुधारते, तेव्हा वारंवार येणाऱ्या मुरुमांच्या समस्या कमी होतात. पश्चिमोत्तानासन रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतं यामुळे त्वचा उजळून निघते. पश्चिमोत्तानासनाच्या नियमित सरावाने काळे डाग आणि सुरकुत्या देखील कमी होतात.
भुजंगासन
जर तुमची त्वचा कोरडी असेल आणि शरीरात अनेकदा कडकपणा जाणवत असेल तुम्ही भुजंगासन करावं असा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे फक्त पाठीचा आणि खांद्यांचा कडकपणा केवळ कमी होणार नाही, तर नियमित व्यायामामुळे मानसिक शांती देखील मिळेल. भुजंगासन, हे त्वचेला गुळगुळीत करायला मदत करते आणि चेहऱ्यावर चमक आणते,त्यामुळे त्वचा उजळण्यासही मदत होते.
अधोमुख शवासन
या योगाच्या सरावामुळे शरीर आणि चेहऱ्याचा रक्त प्रवाह सुधारतो, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते त्वचा निरोगी आणि चमकदार होते. अधोमुख शवासनामुळे मनातली नकारत्मकता दूर व्हायला मदत होते.