TRENDING:

Yogasana : महिलांच्या आरोग्यासाठी योगासनांचं महत्त्व, शारीरिक - मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर

Last Updated:

विशेषतः मुलींसाठी, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. मुली जसजशा मोठ्या होतात तसतसे त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. यासाठी, लहानपणापासूनच योग्य पावलं उचलली गेली तर या समस्या खूप कमी होऊ शकतात. यासाठी योगासनं हा खूप चांगला पर्याय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही व्यायामाचा उपयोग होतो.
News18
News18
advertisement

मुला - मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक शारीरिक बदलांना सामोरं जाताना व्यायामाची साथ असेल तर या बदलांचा स्वीकार करणं सोपं होऊ शकतं.

विशेषतः मुलींसाठी, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. मुली जसजशा मोठ्या होतात तसतसे त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. यासाठी, लहानपणापासूनच योग्य पावलं उचलली गेली तर या समस्या खूप कमी होऊ शकतात. यासाठी योगासनं हा खूप चांगला पर्याय आहे. योग प्रशिक्षक दीक्षा शर्मा यांनी इंस्टाग्राम हँडलवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

advertisement

Skin Care : त्वचेसाठी टरबुजाच्या बिया सुपरफूड, जाणून घ्या बियांचे फायदे

या व्हिडिओमधे, त्यांनी मुलींना दररोज तीन योगासनांचा सराव करण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यात अनेक समस्या टाळण्यासाठी आतापासूनच या तीन योगासनांचा सराव करणं आवश्यक आहे असं त्यांनी व्हिडिओत सांगितलंय.

देवियासन - देवियासन हे विशेषतः मुली आणि किशोरवयीन मुलांसाठी फायदेशीर आहे. हे आसन शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतं आणि प्रजननाशी संबंधित आरोग्यासाठी हे उपयुक्त ठरतं. मुली जसजशा मोठ्या होतात तसतसे त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. हे आसन शरीराचं संतुलन राखण्यासाठी, पेल्विक एरिया मजबूत करण्यासाठी आणि अंतर्गत आरोग्य चांगलं राखण्यासाठी उपयुक्त आहे.

advertisement

Digestion : पोट स्वच्छ ठेवण्यासाठी करा हे पूरक बदल, दिवसभर वाटेल फ्रेश

चॉपिंग द वूड - या योगाभ्यासामुळे शारीरिक शक्ती तसंच मानसिक शक्तीही वाढते. यामुळे हात, खांदे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. यामुळे ताण कमी होतो आणि सकारात्मकता वाढते.

वीरभद्रासन - वॉरियर पोज - याशिवाय, दीक्षा शर्मा वीरभद्रासन म्हणून ओळखलं जाणारं योद्धा आसन करण्याची शिफारस केली आहे. या आसनामुळे केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही बळकटी मिळते, आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता सुधारते आणि संतुलन साधता येतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीत करताय रासायनिक खतांचा वापर, वेळीच व्हा सावध, नाहीतर होतील हे गंभीर परिणाम
सर्व पहा

तिन्ही योगासनं महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. दररोज थोडा वेळ काढून त्यांचा सराव करू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Yogasana : महिलांच्या आरोग्यासाठी योगासनांचं महत्त्व, शारीरिक - मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल