Skin Care : मऊ आणि चमकदार त्वचेसाठी टरबुजाच्या बिया आहेत वरदान, जाणून घ्या कसा करायचा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी टरबुजाच्या बिया वरदान आहेत. या बियांमुळे, मुरुमंही कमी होतात. त्वचेचं मॉईश्चरायझेशन, त्वचेचा पोत चांगला राखण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात. समजून घेऊया या बियांमधले पोषक घटक आणि त्याचा त्वचेसाठीचा उपयोग.
मुंबई : फलाहार तब्येतीसाठी उत्तम मानला जातो. तसंच काही फळं विशेषत: त्वचेसाठी उपयुक्त असतात. फळांप्रमाणेच फळांच्या बिया हाही एक चांगला पर्याय आहे.
त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी टरबुजाच्या बिया वरदान आहेत. या बियांमुळे मुरुमंही कमी होतात. त्वचेचं मॉईश्चरायझेशन, त्वचेचा पोत चांगला राखण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात. समजून घेऊया या बियांमधले पोषक घटक आणि त्याचा त्वचेसाठीचा उपयोग.
टरबुजाच्या बियांमधले पोषक घटक - टरबुजाच्या बियांमधे जीवनसत्त्वं अ, ब आणि ई, तसंच मॅग्नेशियम, लोह - आयर्न, तांबं - कॉपर, पोटॅशियम, लिनोलिक ॲसिड, ओलेइक ॲसिड आणि पामिटिक ॲसिड असतं.
advertisement
त्यात स्टीरिक ॲसिड आणि इतर पोषक घटक असतात. हे घटक त्वचा आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
मुरुम - मुरुम घालवण्यासाठी टरबुजाच्या बियांचा वापर करता येईल. यातल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, त्वचेवरची सूज कमी करणं शक्य होतं. चेहऱ्यावरची छिद्रं स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी याचा उपयोग होतो.
advertisement
त्वचा चांगली राखण्यासाठी, आहारात कलिंगडाच्या बियांचा समावेश करू शकता. बिया भाजून सॅलडमधे घालू शकता.
टरबुजाच्या बियांचं तेल - त्वचा उजळवण्यासाठी टरबुजाच्या बियांचं तेल वापरू शकता. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा, हलक्या हातानं मसाज करा आणि नंतर झोपा.
फेस मास्क - टरबुजाच्या बियांचा वापर फेस मास्क म्हणून देखील करू शकता. यासाठी, टरबूजाच्या बियांची पावडर बनवा आणि त्यात दही, मध किंवा कच्चं दूध मिसळा आणि चेहऱ्याला लावा.
advertisement
ॲलर्जी येत असेल तर पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 11:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : मऊ आणि चमकदार त्वचेसाठी टरबुजाच्या बिया आहेत वरदान, जाणून घ्या कसा करायचा वापर










