घरी सोनं साफ करताना 90 टक्के लोक करतात 'या' चुका, तुम्ही तर करत नाही ना? चमक तर जाईल किंमतही होईल कमी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
How to clean gold jewellery at home : अनेकजण घरातील काही सोप्या युक्ती किंवा जुगाड वापरून दागिने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? दागिने साफ करण्याची चुकीची पद्धत तुमच्या सोन्याचे कायमस्वरूपी नुकसान करू शकते आणि त्याची पुनर्विक्रीचे मूल्य कमी करू शकते.
advertisement
advertisement
दागिने साफ करताना या चुका कधीही करू नका:1. टूथपेस्टचा वापर टाळा अनेकांना असं वाटतं की टूथपेस्टने दात चमकतात तसे सोनेही चमकेल. पण सोन्याच्या दागिन्यांसाठी टूथपेस्ट अत्यंत घातक आहे. टूथपेस्टमध्ये असलेले 'अब्रेसिव्ह' (Abrasive) घटक सोन्याच्या मऊ पृष्ठभागावर सूक्ष्म ओरखडे (Scratches) निर्माण करतात. यामुळे दागिन्यांची मूळ झळाळी कायमची नष्ट होऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घरच्या घरी दागिने साफ करण्याची सुरक्षित पद्धततज्ज्ञांच्या मते आणि ज्वेलरी असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खालील पद्धत सर्वात सुरक्षित मानली जातेएका बाऊलमध्ये थोडे कोमट (उकळते नाही) पाणी घ्या.त्यात दोन थेंब डिश वॉशिंग लिक्विड किंवा बेबी शॅम्पू टाका. (कठोर डिटर्जंट वापरू नका).दागिने 10-15 मिनिटे या पाण्यात भिजत ठेवा.लहान मुलांचा अत्यंत मऊ (Extra Soft) टूथब्रश घेऊन हलक्या हाताने कोपऱ्यांमधील घाण काढा.स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर दागिने मऊ सुती कापडाने (Microfiber cloth) पूर्णपणे कोरडे करा.
advertisement











