Toxic Movie: काही सेकंदांचा खेळ, बया झाली फेमस; तो सीन पाहून सगळे बावचळले, यशसोबतची ती गोरी कोण? सगळेच शोधायला लागले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Toxic Movie Intimate Scenes: ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश याची बहुप्रतिक्षित फिल्म ‘टॉक्सिक’ चा टीझर अखेर रिलीज झाला असून तो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. टीझरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या काही तासांत तो व्हायरल झाला आहे.
2 मिनिटे 52 सेकंदांच्या ‘टॉक्सिक’च्या टीझरमध्ये प्रचंड व्हायोलन्स, गडद वातावरण आणि काही बोल्ड, इंटिमेट दृश्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे टीझरमध्ये यशसोबत एका अतिशय सुंदर महिलेला इंटिमेट सीनमध्ये दाखवण्यात आले आहे. काही सेकंदांचा हा सीन इतका प्रभावी ठरला की ती अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंड करू लागली. या सीनची क्लिप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
2014 साली नताली बर्नने अ‍ॅक्शन फिल्म ‘द एक्सपेंडेबल्स 3’ मध्ये छोटा पण लक्षवेधी रोल केला. यानंतर ती ‘डेविल्स होप’ या चित्रपटाची प्रोड्यूसरही राहिली. 2015 मध्ये तिने ‘अवेकन’ नावाचा अ‍ॅक्शन चित्रपट लिहिला, त्यात अभिनय केला आणि प्रोड्यूसही केला. 2016 मध्ये ती ‘क्रिमिनल’ या चित्रपटात झळकली, तसेच जेसन स्टॅथम सोबत ‘मेकॅनिक: रिसरेक्शन’ मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.
advertisement
advertisement
नताली बर्न ही युक्रेनी-अमेरिकन अभिनेत्री, प्रोड्यूसर, मॉडेल, पटकथालेखिका आणि मार्शल आर्टिस्ट आहे. ‘एक्सपेंडेबल्स 3’, ‘एक्सिलरेशन’ आणि ‘मेकॅनिक: रिसरेक्शन’ यांसारख्या अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. बॅले आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण असल्यामुळे ती अनेक वेळा स्वतःचे स्टंट्स स्वतःच करते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









