शरीरातील महत्वाच्या ग्रंथींद्वारे हार्मोन्स तयार होतात आणि जवळजवळ प्रत्येक शारीरिक कार्यासाठी ती महत्त्वाची असतात. या संप्रेरकांचं संतुलन राखणं आवश्यक आहे आणि योग हा यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. काही योगासनांमुळे हार्मोनल ग्रंथी उत्तेजित होतात आणि संतुलन राखण्यास मदत होते.
Hair Nourishment : सुंदर, घनदाट, लांब केसांसाठी मोलाचा सल्ला, अशी घ्या काळजी
advertisement
सर्वांगासन - हे आसन थायरॉईड आणि पिट्यूटरी ग्रंथींना सक्रिय करतं. यासाठी पाठीवर झोपा, हळूहळू दोन्ही पाय वर करा आणि शरीर वर उचला, हातांनी कंबरेला आधार द्या. शरीराचं वजन खांद्यावर ठेवा. तीस सेकंद ते एक मिनिटापर्यंत या स्थितीत राहा.
भुजंगासन - हे आसन एड्रिनल ग्रंथींना सक्रिय करतं आणि यामुळे ताण कमी होतो. या आसनासाठी पोटावर झोपा, तळवे खाली टेकवा आणि श्वास घ्या, डोकं आणि छातीचा म्हणजे शरीराचा नाभीपर्यंत भाग वरती खेचा. या स्थितीत काही सेकंद राहा, नंतर हळूहळू खाली व्हा.
धनुरासन - हे आसन अंडाशय, थायरॉईड आणि पुनरुत्पादक अवयवांसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी, पोटावर झोपा, पाय वाकवा आणि हातांनी घोटे धरा. श्वास घ्या आणि शरीर कंबरेपासून वर येईल आणि धनुष्याचा आकार येईल अशा प्रकारे ताणा.
Declutter : नवीन वर्षात आरोग्य शत्रूंना दाखवा बाहेरचा रस्ता, आजारांना दूर पळवा
विपरित करणी - या आसनामुळे मानसिक ताण कमी होतो आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते.
भिंतीजवळ झोपा आणि पाय भिंतीवर ठेवा. हात आरामशीर ठेवा आणि डोळे बंद करा आणि पाच-दहा मिनिटं या आसनात रहा.
पश्चिमोत्तानासन - या आसनामुळे प्रजनन प्रणाली आणि पचनक्रिया सुधारते. सरळ बसा, दोन्ही पाय समोर पसरवा, नंतर हळूहळू पुढे वाकून हातांनी पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
अर्ध मत्स्येंद्रासन - हे आसन यकृत, पचन आणि स्वादुपिंडाला उत्तेजित करते. हे आसन करण्यासाठी बसा आणि एक पाय वाकवा आणि तो दुसऱ्या पायावर ठेवा. नंतर, शरीर फिरवताना, विरुद्ध हातानं गुडघा धरा आणि दुसऱ्या दिशेनं पहा. रोज सकाळी रिकाम्या पोटी पंधरा-तीस मिनिटं ही योगासनं करा. संतुलित आहार आणि पुरेशी झोपही यासाठी महत्त्वाची आहे. काही आठवड्यांत हार्मोनल संतुलनात सुधारणा दिसून येईल.
यातील आसनं करण्यासाठी योग प्रशिक्षकांचा सल्ला घ्यायला विसरु नका.
