TRENDING:

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यासाठी नऊवारी साड्या अन् पारंपरिक ड्रेस, फक्त 650 रुपयांत, मुंबईत खरेदीसाठी हे बेस्ट ऑप्शन!

Last Updated:

गुढीपाडव्याला महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल आणि यासाठी तुम्ही जर रेडीमेड पारंपारिक नऊ वारी साडी किंवा ड्रेस शोधत असाल तर दहिसर मधील सई डिझाईन्समध्ये तुम्हाला परवडेल अश्या दरात उपलब्ध आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो. यंदा रविवारी, 30 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. परंपरा आणि संस्कृतीचा मेळ आपण सगळेच जपतो. गुढीपाडवा निमित्त बाजारात अनेक सजावटीचे तसंच महिलांसाठी पारंपरिकलुकसाठी अनेक पेहराव, ड्रेस आले आहेत. गुढीपाडवा म्हंटल्यावर यावेळी महिला वर्ग आवर्जून पारंपारिक लूकमध्ये तयार होतात. यंदाच्या सणाला तुम्हालाही महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल आणि यासाठी तुम्ही जर रेडीमेड पारंपारिक नऊवारीसाडी किंवा ड्रेस शोधत असाल तर दहिसर मधील सई डिझाईन्समध्ये तुम्हाला परवडेल अश्या दरात उपलब्ध आहेत.
advertisement

सई डिझाईन्समध्ये तुम्हाला ब्राम्हणी, मस्तानी, पेशवाई , राजलक्ष्मी यासारख्या नऊवारी साड्या फक्त 650 रुपयांपासून शिवून मिळतील. यांच्याकडील खास कलेक्शन म्हणजे लहान मुलांसाठी अगदी 1 महिन्याच्या लहान बाळापासून ते 60 ते 70 वर्षांच्या आजीसाठी नऊवारी साडी शिवून मिळते. तसंच अनेक अनेक वेगवेगळ्या डिझाईन्सचे साडीपासून ड्रेस शिवून मिळतात.

चिकनपेक्षा लिंबू महाग! किलोला किती मोजावे लागतायेत पैसे, पाहा आजचे बाजारभाव

advertisement

यासोबतच इथे स्लिंग बॅग फक्त 50 रुपयांपासून मिळेल. लहान मुलांसाठी पारंपरिक कपडे अगदी स्वस्त दरात इथे मिळतात.

गेली 15 वर्ष विनया विचारे या सई डिझाईन्स चालवत आहेत. त्यांनी शिवलेले ड्रेस, वेवगेळ्या स्टाइलच्या साडी यामुळे आजही ग्राहकांचा विश्वास टिकून आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तुम्हाला जर सई डिझाईन्समधून नऊवारी साड्या, ड्रेसेस शिवून हवे असतील तर दहिसर पूर्व, अशोकवनमधील दुकानाला भेट देऊ शकता. याबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून ऑर्डर देऊ शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यासाठी नऊवारी साड्या अन् पारंपरिक ड्रेस, फक्त 650 रुपयांत, मुंबईत खरेदीसाठी हे बेस्ट ऑप्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल