छत्रपती संभाजीनगर : दिवाळी हा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटल्यावर अनेकजण मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. विशेष म्हणजे महिलांना दिवाळीसाठी साड्या घ्यायची खूप हौस असते. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात मस्त साड्या खरेदी करायच्या असतील, तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्त साड्या तुम्ही कुठे खरेदी करू शकता, याचविषयी आपण जाणून घेऊयात.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा येथे गुलमंडी परिसर आहे. या गुलमंडीमध्ये रंगारी गल्ली आहे. या रंगारी गल्लीमध्ये तुम्हाला अगदी स्वस्त दरात सगळ्या प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त 150 रुपयांपासून साड्यांचा किमती सुरू होतात. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या लेटेस्ट डिझाईनच्या साड्या या उपलब्ध आहेत.
या ठिकाणी तुम्हाला डेली विअरसाठी साडी, कॉटन साडी, ऑरगॅनजा साडी, नेटची साडी, डिझायनर साडी काठापदराची साडी, जरीची साडी, पैठणी साडी, सेमी पैठणी अशा सगळ्या प्रकारच्या साड्यांचे प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या रंगाच्या सगळ्या साड्या उपलब्ध आहेत.
Diwali 2024 : 500 वर्षांचा इतिहास, पुण्यात स्वस्त आणि आकर्षक पणत्या मिळण्याचं ठिकाण, VIDEO
विशेष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अगदी स्वस्त दरामध्ये चांगल्या साड्या उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी दिवाळीसाठी आता नवीन कलेक्शनही आले आहे. त्यामुळे या साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही गुलमंडी येथील रंगावर गल्लीमध्ये येऊन या साड्या खरेदी करू शकता, असे विक्रेते मोहम्मद यांनी सांगितले.