मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षाच लक्ष लागले आहे. दिवाळी झाल्यामुळे आता प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पा दरम्यान मुंबई महापालिका निवडणुक महायुती एकत्र लढणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे जागा वाटपाचा नेमका माहितीचा फॉर्म्युला कसा असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने मुंबईत 150 जागांची तयारी सुरू केली आहे.
advertisement
150 जागा लढण्याचे भाजपचे टार्गेट
मुंबईतील उमेदवारांची चाचपनी देखील भाजपने सुरु केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा दिल्या जाऊ शकतात असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येतंय. भाजपचे नेते जाहीरपणे जरी जसं सांगत नसले तरी आमच्या कार्यकर्त्यांना भाजपने सर्वात जास्त जागा लढवाव्यात असं वाटत असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. 150 जागा लढण्याचे टार्गेट भाजपचे आहे.
भाजपची नेमकी रणनीती काय?
- शिंदे यांच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा सोडून त्यांचे उमेदवार निवडून येण्याची जबाबदारी भाजपची असणार
- दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंच्या शिवसेनेला त्याचा फटका बसू शकतो यामुळे भाजप सर्वाधिक जागा लढण्याच्या विचारात
- ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जिंकून येणे हाच निकष डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप होईल
- ज्या जागांवर तेढ निर्माण होईल त्या जागांबाबत महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून पेच सोडवण्याचा प्रयत्न करतील
- जागा वाटपात विधानसभेप्रमाणेच रडून ती आखली जाईल
- उमेदवारांची अदलाबदली महायुतीत जागा वाटपादरम्यान होण्याची शक्यता
- येत्या काळात महाविकास आघाडी आणि विशेषत: ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याची रणनीती आखली जाणार
- ठाकरेंना मुंबईत फायदा होऊ नये यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जाणार
- दरम्यान भाजपच्या या जागा वाटपाच्या चर्चेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंना भाजपचा ऐकावं लागणार अशी बोचरी टीका अंबादास दानवे यांनी केलीय.
एकीकडे भाजपने 150 जागाची तयारी केलेली असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील 100 हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे जागा वाटपा आधीच तयार झालेला हा पेच महायुतीचे तिन्ही नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
