TRENDING:

2 सख्ख्या बहिणींनी घरातच तयार केला 'मृत्यूचा सापळा', 20 हजारांमध्ये 'नकोशी'ची करायच्या हत्या!

Last Updated:

वर्षा ही पेशाने नर्स आहे, तर उज्ज्वला तिला या कामात मदत करायची. विशेष म्हणजे, संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या आईच्या घराचा वापर या बेकायदेशीर कृत्यासाठी केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर:  महिनाभराच्या अंतराने दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटने छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकलंय. दोन सख्ख्या बहिणी आणि एका नर्सने मिळून घरातच मृत्यूचा व्यापार मांडला होता. ७० ते ८० हजार रुपयांचं पॅकेज देऊन 'नकोशी'ची गर्भातच हत्या केली जात होती. या रॅकेटचे धागेदोरे आता सिल्लोडच्या एका डॉक्टरापर्यंत पोहोचले असून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आता अवैध गर्भपात रॅकेटचे धाकेदोरे मराठवाडभर पसरले असल्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड तालुक्यात रुग्ण आणले जात असल्याची माहिती आता समोर आली आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगरचा सातारा परिसर... एका वृद्ध मातेच्या घरात तिच्याच दोन लेकींनी मृत्यूचा भयानक सापळा रचला होता. वर्षा जाधव आणि उज्ज्वला गायकवाड या दोन सख्ख्या बहिणींनी शहरात फिरतं गर्भपात केंद्रच सुरू केलं होतं. वर्षा ही पेशाने नर्स आहे, तर उज्ज्वला तिला या कामात मदत करायची. विशेष म्हणजे, संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या आईच्या घराचा वापर या बेकायदेशीर कृत्यासाठी केला.

advertisement

सिल्लोड कनेक्शन उघड

या रॅकेटचं कनेक्शन सिल्लोड तालुक्यापर्यंत पसरलंय. निल्लोड येथील बीएएमएस डॉक्टर विकास मिठाराम आहेर हा या रॅकेटचा मुख्य दुवा असल्याचं समोर आलंय. दुसरी मुलगी नको असलेल्या एका महिलेला या डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली या टोळीकडे पाठवलं होतं. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हा संपूर्ण व्यवहार ७० ते ८० हजारांमध्ये ठरल्याचं उघड झालं आणि पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

advertisement

२० आणि ३० हजार रुपये रेटकार्ड

धक्कादायक म्हणजे, रुग्ण आणण्यासाठी 20 हजार रुपये दिले जात होते. तर  30 हजार गर्भपात करण्यासाठी दिले जात होते. एवढंच नाहीतर 20 हजार रुपयांमध्ये गर्भाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतल्या जात होते.  दोन वर्षाअगोदर गर्भपात प्रकरणात अटक झालेला आणि आता जामिनावर असलेला डॉक्टर मुख्य सूत्रधार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

advertisement

70 हजार रुपयांमध्ये व्हायचे गर्भपात

डॉक्टर आहेरने अवघ्या दोन वर्षांत तीन मजली इमारत उभी केली, ज्यामध्ये रुग्णालय आणि लॅब चालवली जाते. यापूर्वीच्या प्रकरणांचे धागेदोरेही भोकरदन आणि सिल्लोडपर्यंत पोहोचले होते. या रॅकेटमधील मुख्य साथीदार ज्योती पवार अजूनही पसार आहे. मात्र, न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीस या रॅकेटमध्ये अजून किती डॉक्टर आणि मध्यस्थ सामील आहेत, याचा शोध घेत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

पैसे कमवण्यासाठी पोटच्या गोळ्याची हत्या करणाऱ्या या निर्दयी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असला, तरी यामागे अजून किती मोठी साखळी आहे, हे आता तपासातच स्पष्ट होईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
2 सख्ख्या बहिणींनी घरातच तयार केला 'मृत्यूचा सापळा', 20 हजारांमध्ये 'नकोशी'ची करायच्या हत्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल