माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 लाख 34 हजार लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आलं. काही महिला एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून तर काही ठिकाणी एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून सुद्धा या योजनेत आपत्र ठरवल्याचं समोर आलं आहे.
जून महिन्याचे पैसे या लाभार्थींचे तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. या लाभार्थ्यांची फेरपडताळणी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतरच त्यांच्या खात्यावर पैसे येतील अन्यथा त्यांचे नाव बाद केले जाईल अशी माहिती मिळाली आहे. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आले आहेत.
advertisement
ज्यांनी सरकारला फसवून पैसे लाटले त्यांच्यावर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या, 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1 लाख महिलांची नाव या योजनेतून बाद करण्यात आली आहेत. 10 हजार महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी गाडी आहे. 1 लाख 60 हजार महिलांनी नारी शक्ती योजनेचा देखील लाभ घेतला, अशा दोन नाही तर पाच लाख महिलांची नावं या योजनेतून आधीच बाद करण्यात आली आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 14 हजारहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फेरपडताळणी होणार असं म्हटलं होतं. महिला व बालविकास विभागाने शासनाच्या अन्य विभागाकडून ही माहिती मागवली होती. फेरतपासणीनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 26 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत.