TRENDING:

फॉरेन ट्रीप ठरली अखेरची, बीडच्या तरुणीच्या थायलंडमध्ये दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Beed News: महाराष्ट्राच्या बीड येथील एका २६ वर्षीय तरुणीचा थायलंडमध्ये मृत्यू झाला आहे. संबंधित तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत थायलंडला फिरायला गेली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Beed News: महाराष्ट्राच्या बीड येथील एका २६ वर्षीय तरुणीचा थायलंडमध्ये मृत्यू झाला आहे. संबंधित तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत थायलंडला फिरायला गेली होती. मात्र तिची ही परदेशवारी अखेरची ठरली आहे. तिचा थायलंडमधील फुकेटमध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. ५ मार्च रोजी तिचा परदेशात मृत्यू झाला होता. आता अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिचा मृतदेह आज गुरुवारी मुंबईत येणार आहे.
pooja muley accident in Thailand
pooja muley accident in Thailand
advertisement

पूजा प्रशांत मुळे असं थायलंडमध्ये मृत पावलेल्या २६ वर्षीय तरुणीचं नाव आहे. पूजा मुळे ही मूळची बीड येथील रहिवासी असून ती पुण्यातील खराडी येथील 'युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड'मध्ये कार्यरत होती. १ मार्च रोजी ती आपल्या एका मैत्रिणीसोबत दिल्लीतील एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत थायलंडला पर्यटनासाठी गेली होती. फुकेट येथे गेल्यानंतर तिने एक दुचाकी भाड्याने घेतली होती. ती मैत्रिणीसह दुचाकीने फुकेट परिसरातून फिरत होती. पण तिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

advertisement

अपघाताच्या वेळी पूजाची मैत्रीण दुचाकी चालवत होती, तर पूजा मागे बसलेली होती. अचानक तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी जोरात दुभाजकाला धडकली. या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या मैत्रिणीचा हात फ्रॅक्चर झाला, मात्र मागे बसलेल्या पूजाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने स्थानिक कुसूमई रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

advertisement

प्रशासकीय मदतीने मृतदेह मायदेशी

पूजाचा मृत्यू ५ मार्च रोजी झाला होता. तेव्हापासून तिचा मृतदेह थायलंडमध्येच होता. परदेशातून मृतदेह भारतात आणण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणं मोठं आव्हान होतं. यासाठी भारतीय दूतावास, बीड जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आता अखेर तिचा मृतदेह मुंबईत आणला जाणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

पूजाचे वडील बीडमधील पूर्णवादी बँकेत अधिकारी आहेत. तिचा भाऊ सध्या शिक्षण घेत आहे. आज गुरुवारी, अपघाताच्या ६ दिवसांनंतर पूजाचा मृतदेह विमानाने मुंबईत आणण्यात आला असून, दुपारी तिथून तो बीडला नेण्यात येणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फॉरेन ट्रीप ठरली अखेरची, बीडच्या तरुणीच्या थायलंडमध्ये दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल