TRENDING:

आधी दगडाने बेदम मारहाण, मग कत्तीने हातपाय तोडून टाकण्याची धमकी, बीडमधील अमानुष घटना

Last Updated:

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथे पानंद रस्त्याच्या वादातून एका शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथे पानंद रस्त्याच्या वादातून एका शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. नऊ जणांच्या टोळीने मिळून तिघांना दगडाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यात आरोपीनं पीडित कुटुंबीयांना धमकावताना दिसत आहे. या व्हिडीओ हिंसक कृत्य अन् अश्लील शिवीगाळ असल्याने न्यूज १८ मराठी संबंधित व्हिडीओ पब्लिश करत नाही.
News18
News18
advertisement

वादाचं नेमकं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पहाडी पारगाव येथील शेतकरी बाळकृष्ण अंडील यांच्या शेतातील पानंद रस्त्यावर काही जणांनी दगड टाकले होते. "रस्त्यावर दगड का टाकले?" अशी विचारणा बाळकृष्ण यांनी केली असता, आरोपींनी संतापून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. साध्या विचारणेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.

नऊ जणांचा हल्ला, तिघे जखमी

advertisement

या प्रकरणात एकूण नऊ आरोपींनी मिळून बाळकृष्ण अंडील यांच्यासह तिघांना दगडांनी बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी "कत्तीने तुमचे हातपाय तोडून टाकू" अशी गंभीर धमकी दिल्याचे पीडितांनी सांगितलं. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वाराती (स्वामी रामानंद तीर्थ) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

advertisement

पोलिसांत गुन्हा दाखल आणि तपासाचे आव्हान

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर...
सर्व पहा

याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात नऊ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पानंद रस्त्यांचे वाद जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी धुमसत असताना, पहाडी पारगावमधील या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा सखोल तपास धारूर पोलीस करत आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी दगडाने बेदम मारहाण, मग कत्तीने हातपाय तोडून टाकण्याची धमकी, बीडमधील अमानुष घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल