Shiv Jayanti 2026: तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर आवाक् राहाल!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Shiv Jayanti 2026: अवघ्या पाचव्या वर्षापासून अथांगने युद्धकलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तलवारबाजी, भाला, दांडपट्टा अशा विविध पारंपरिक कलांत त्यानं मोठं यश मिळवलं.
पुणे: महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. आपल्या प्रत्येकांसाठी हा दिवस पराक्रम, धैर्य आणि स्वाभिमानाची आठवण करून देणारा आहे. याच आदर्शाने प्रेरित होऊन पुण्यातील अवघ्या 9 वर्षांचा अथांग मुजुमले पाटील हा चिमुकला शिवकालीन युद्धकलेत पारंगत होत आहे. अवघ्या पाचव्या वर्षापासून त्याने युद्धकलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तलवारबाजी, भाला, दांडपट्टा अशा विविध पारंपरिक शस्त्रकलेचा तो सराव करत असून लहान वयातच त्याने उल्लेखनीय प्रावीण्य मिळवलं आहे. अथांगच्या याच प्रवासाविषयी लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
अथांगने सांगितलं की, 5 वर्षांचा असल्यापासून तो ही युद्धकला शिकत आहे. यामध्ये सिंगल काठी, डबल काठी, तलवार, भाला, पट्टा, चक्र अशा अनेक प्रकारच्या शस्त्रकलेचा समावेश आहे. या युद्धकलेचं प्रशिक्षण त्याने पुण्यातील गनिमी कावा शिवकालीन युद्धकला आखाडा याठिकाणी घेतलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून ही आवड निर्माण झाली. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आणि त्यांच्या मावळ्यांसारखी युद्धकला अवगत करायची होती. त्यामुळेच मी युद्धकला शिकण्यास सुरुवात केल्याचंही त्यानं सांगितलं.
advertisement
पालकांच्या प्रयत्नामुळे अथांग युद्धकलेत पारंगत
अथांगच्या पालकांनी त्याला लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुस्तके आणि व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच या विषयाची आवड निर्माण झाली. ही आवड लक्षात घेऊन पालकांनी त्याला युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तो काही महिन्यातच या युद्धकलेत पारंगत झाला. लहान वयातच त्याने जिल्हास्तरीय 4 सुवर्ण पदके, राज्यस्तरीय 3 सुवर्ण पदके आणि 1 राष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले आहेत. त्याशिवाय, 15 हून अधिक पुरस्कारही मिळाले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 12:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Shiv Jayanti 2026: तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर आवाक् राहाल!







