advertisement

दोन जण, एक निळी कार अन् खानावळीमागे आडोसा; डिकी उघडताच समोर आलं काळं कृत्य, लगेचच अटक

Last Updated:

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रहिवासी आहेत. हे अवयव त्यांनी कुठून आणले आणि ते कोणाला विकणार होते, याचा तपास आता वन विभाग करत आहे

वन्यप्राण्यांच्या अवयवांची करत होते तस्करी (AI Image)
वन्यप्राण्यांच्या अवयवांची करत होते तस्करी (AI Image)
पुणे : मंचर परिसरात वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे. मोरडे फूड्स कंपनीजवळ एका निळ्या रंगाच्या कारमध्ये संशयास्पदरित्या बसलेल्या दोन इसमांना वन विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता, त्यात खवल्या मांजराचे खवले, नखे आणि सांबराची शिंगे असा अवैध मुद्देमाल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
गुप्त माहिती अन् वन विभागाचा सापळा
वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांना मंचर परिसरात खवल्या मांजर आणि सांबराच्या शिंगांची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाने मोरडे फूड्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या झटका खानावळीजवळ पाळत ठेवली. तिथे एम.एच. ०४, डी. वाय. ५६७ या क्रमांकाची निळी स्विफ्ट डिझायर कार उभी असल्याचे दिसले. संशय बळावल्याने पथकाने अचानक गाडीवर धाड टाकली.
advertisement
गाडीत आढळला धक्कादायक साठा
गाडीमध्ये उदय शंकर सुर्वे आणि नईम करीम खान (दोघेही रा. श्रीवर्धन, जि. रायगड) हे दोघे बसले होते. वन विभागाने त्यांची चौकशी करून गाडीची झडती घेतली असता, त्यांच्याकडे सुमारे ३ किलो खवल्या मांजराचे खवले, ३ नखे आणि सांबराची ४ शिंगे आढळून आली. हा सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली कार वन विभागाने जप्त केली असून दोघांनाही जागीच अटक करण्यात आली आहे.
advertisement
तस्करीचे धागेदोरे रायगडपर्यंत
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रहिवासी आहेत. हे अवयव त्यांनी कुठून आणले आणि ते कोणाला विकणार होते, याचा तपास आता वन विभाग करत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे तस्करी करणाऱ्या टोळीचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दोन जण, एक निळी कार अन् खानावळीमागे आडोसा; डिकी उघडताच समोर आलं काळं कृत्य, लगेचच अटक
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement