अहमदनगर : शेअर्स मार्केटमधून गुंतवणूक दुप्पट करून देती किंवा महिन्याने त्याचा मोठा परतावा देण्याचे आमिष देऊन शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अनेकांची फसवणूक झाली आहे. शेअर्स मार्केटच्या अभ्यास करून त्यासाठी सावज शोधून त्याच्यावर डाव टाकून कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याचं उघड झाला आहे. यामध्ये जवळपास 300 ते 400 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आले आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन ट्रेडर्सनी धूम ठोकली आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तालुक्यातील व्यवहारही ठप्प झाले आहे.
advertisement
शेवगाव तालुका तसं पाहिला गेला या तालुक्यातील काही भाग दुष्काळी आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची परिस्थिती जनतेने असते त्यात काही महिन्यापासून या परिसरात शेअर्स मार्केटच्या नावाखाली टेंडर्स यांनी धुमाकूळ घातला होताय या परिषद शेअर्स मार्केटचे हब म्हणून नाव रूपाला हे आले होते परताव्याच्या अमिषा पोटी येथील शेत कामगार, वीट कामगार, शेतकरी, शिक्षक अशा अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी या शेअर्स मार्केटमध्ये लावली. गुंतवणूकदाराकडून परताव्याचे आमिष दाखवून या ट्रेडर्सनी लाखो रुपयाचे गुंतवणूक घेत दर महिना 7 ते 20 टक्के परतावा देण्याचा सांगितले होते. एक दोन महिने परताव्याचे पैसे दिल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम घेऊन हे ट्रेडर्स फरार झाले आहेत.
शेअर्स मार्केटचे कोणतेही ज्ञान नसताना नागरिक पर्तव्याचे परताव्याच्या आमिषाने गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत असल्याची लक्षात आल्यानंतर हा फंडा अनेकांनी वापरण्यास सुरुवात केली. यामुळे शेवगाव तालुक्यात तब्बल 280 ट्रेडर्स गेल्या काही महिन्यात उदयास आले होते. यामुळे जास्त परतावा मिळत असल्याच्या लोभापाई अनेकजण आपले आयुष्य उध्वस्त करून बसले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून दखल घेतली जात नसून पळून गेलेल्या ट्रेडर्सला अभय देत असल्याचा आरोप करत काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काही जणांची ऑफिसही तोडले या परिसरात आलिशान ऑफिस आणि फसव्या जाहिराती देऊन बहुत अशी गुंतवणूकदार खोटी जाहिरात आलिशान ऑफिस पाहून फसले आहेत. नोकरदार वर्गाचा हे मोठा समावेश असून काही जणांनी सोने-तारण ठेवून काहींनी बचत गटाचे पैसे काढून तर काहींनी शेतमाल विक्री करून यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती. पोलिसांकडं अनेकदा तक्रार करूनही पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. मात्र यावर पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे, यामुळे यामागे काय गोड बंगाल आहे किंवा याचा सूत्रधार कोण? हा मोठा प्रश्न आहे.