या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 58 वर्षांचे सुरेश कारवे यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार कारवे गुरुवारी संध्याकाळी दुचाकीवरून कल्याण पूर्वेतील म्हात्रे नाका भागातून जात होते. वाहतूक कोंडी झाल्यामुळे ते देखील थांबले होते. त्याच वेळी समोरून पल्सर दुचाकीवरून दोन तरुण आले आणि त्यांनी सुरेश कारवे यांना पडघ्याला जाणारा रस्ता कोणता आहे, अशी विचारणा केली.
advertisement
लव्ह, लग्न आणि लोचा! परदेशातून परतलेल्या पतीला विमानतळावरच अटक, नेमकं प्रकरण काय?
सुरेश कारवे यांनी त्या तरुणांना हाताने दिशा दाखवली. त्याचवेळी पल्सरवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने कारवे यांच्या मानेवर जोराची थाप मारून त्यांच्या गळयातील सोनसाखळी ओढली. मात्र, कारवे यांनी सोनसाखळी वाचवण्याचा प्रयत्न केला. या ओढाताणीत सोनसाखळीचा अर्धा भाग चोरांचा हातात तर अर्धा भाग कारवेंच्या हातात राहिला. सोनसाखळी मिळताच पल्सरवरील दोन्ही तरुण मलंगगडच्या दिशेने पळून गेले. सुरेश कारवे यांनी दिलेल्य तक्रारीनुसार, या दोन्ही तरूणांनी आपली ओळख लपवण्यासाठी हेल्मेट आणि रेनकोट घातले होते.
दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत आजदेगावमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. तिथे दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी गेले होते. दुचाकीवरून आलेल्या भुरट्या चोरांनी या महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेले होते. सुरेश कारवे यांच्यासोबत देखील असाच प्रकार घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी दुचाकीवरून येणाऱ्या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.