लव्ह, लग्न आणि लोचा! परदेशातून परतलेल्या पतीला विमानतळावरच अटक, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये वाद वाढले. आता परदेशातून परतलेल्या पतीला विमानतळावरूनच पोलिसांनी ताब्यात घेतले.

लव्ह, लग्न आणि लोचा! परदेशातून परतलेल्या पतीला विमानतळावरच अटक, नेमकं प्रकरण काय?
लव्ह, लग्न आणि लोचा! परदेशातून परतलेल्या पतीला विमानतळावरच अटक, नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर : अलिकडच्या काळात विवाहित महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. काही प्रकरणांत माहेरून पैसै आण किंवा इतरही कारणांवरून महिलांना त्रास दिला जातो. तसेच शारीरिक, मानसिक छळासह जातीवाचक शिवीगाळ आणि छळ केल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील 33 वर्षीय विवाहितेसोबत घडला असून तिने पतीविरोधात थेट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. परदेशात गेलेला पती मायदेशी परतताच पोलिसांनी त्यांना विमानतळावरूनच अटक केली. याच प्रकरणाबाबत जाणून घेऊ.
‎छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रियाने ( नाव बदलेले आहे ) 2022 मध्ये पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यादरम्यान पती विदेशात पसार झाला. न्यायालयाने वारंवार समन्स जारी केले. त्यालाही प्रतिसाद दिला नाही. मात्र, पोलिसांनी काढलेल्या लूक आऊट नोटीसमुळे आरोपी कुणाल कचरुलाल धुमाळ (वय 30, रा. श्रीकृष्णनगर, एन-6) हा देशात परतताच त्याला मुंबई विमानतळावर अडवण्यात आले. त्यानंतर सिडको पोलिसांनी त्याला अटक केली.
advertisement
प्रेमसंबंध, कोर्ट मॅरेज अन् छळ
‎ 7 ऑक्टोबर 2022 रोजी 33 वर्षीय प्रियाने कुणालसह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला होता. प्रिया आणि कुणाल यांचे 2010 पासून प्रेमसंबंध होते. एप्रिल 2021 त्यांनी कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर प्रियाचा छळ सुरू झाला. या छळामुळे प्रियचा गर्भपात देखील झाला. मागासवर्गीय असल्याचे हिणवले जात असल्याचे प्रियाने फिर्यादीत नमूद केले. त्यानंतर माहेरून 10 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. रक्कम दिली नसल्याने सासरच्यांनी घराबाहेर हाकलले.
advertisement
समेटाचा प्रयत्न फसला
प्रियाने 2022 मध्ये छळाविषयी सिडको पोलिसांकडे तक्रार केली. यादरम्यान कुणालला साऊथ आफ्रिकेत कंट्री मॅनेजर म्हणून नोकरी लागली होती. नातेवाइकांनी मध्यस्ती करून समेट घडवून आणला. तेव्हा कुणालने पत्नीला आफ्रिकेत नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो एकटाच निघून गेला. ऑक्टोबर महिन्यात प्रियाने सासरी राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा जातिवाचक शिवीगाळ करून हाकलण्यात आले. त्यानंतर कुणालवर कौटुंबिक छळासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
पोलिसांकडून लूक आऊट नोटीस
याबाबत प्रियाने फिर्याद दिली असून पती कुणाल कचरूलाल धुमाळ, सासू भारती धुमाळ, सासरे कचरूलाल धुमाळ, दीर आदित्य धुमाळ यांच्यासह चुलत सासरे, चुलत सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कुणाल विदेशातच होता. न्यायालयाने वारंवार हजर राहण्याबाबत समन्स जारी केले. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी कुणाल विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती.
advertisement
विमानतळावरच अटक
‎कुणाल नुकताच देशात परतला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विमानतळ प्रशासनाला अलर्ट प्राप्त झाला. त्यांनी त्याला ताब्यात घेत शहर पोलिसांशी संपर्क साधला. सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या सूचनेवरून सहायक फौजदार सुभाष शेवाळे, अंमलदार विशाल सोनवणे व देवा साबळे यांनी धाव घेत त्याला विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याची 12 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
मराठी बातम्या/क्राइम/
लव्ह, लग्न आणि लोचा! परदेशातून परतलेल्या पतीला विमानतळावरच अटक, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement