Ganesh Visarjan 2025: जालन्यात गणपती विसर्जनासाठी वेगळा प्रयोग, महापालिकेनं नेमकं काय केलं?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Ganesh Visarjan 2025: जालन्यात हजारो लहान-मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन मोती तलावात केलं जात होतं.
जालना: 10 दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आता जड अंत:करणाने त्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभर गणेश विसर्जनाची धामधूम बघायला मिळत आहे. जालना शहर देखील गणपती विसर्जनासाठी सज्ज झालं आहे. महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी 19 कोटी रुपये खर्च भव्य विसर्जन कुंडांची निर्मिती केली आहे. लोकल 18ने याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे.
जालना शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. 20 फुटांपेक्षाही उंच गणेश मूर्ती मोती तलावात विसर्जित केल्या जातात. हजारो घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन देखील मोती तलावात केलं जात होतं. पण, पीओपी मूर्तींचं सातत्याने मोती तलावात विसर्जन होत असल्याळे तलावाला पीओपीचा मोठा थर जमा झाला आहे. परिणामी मोती तलावातून पाण्याचं झिरपणं बंद झालं असून निर्मल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण देखील होत आहे.
advertisement
गणपती विसर्जनामुळे मोती तलावचं अस्तित्व धोक्यात आल्याची बाब महापालिकेच्या लक्षात आली. त्यामुळे महापालिकेने वर्षभरापूर्वी मोती तलावाच्या बाजूला मोठ्या आकाराचं कायमस्वरुपीचं विसर्जन कुंड तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या विसर्जन कुंडाचं काम आता पूर्ण झालं असून आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी (5 सप्टेंबर) या विसर्जन कुंडाचं लोकार्पण करण्यात आलं. जालना शहरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन आता या विसर्जन कुंडातच होणार आहे.
advertisement
या विसर्जन कुंडामुळे गणेश मूर्तींच्या विसर्जनाबरोबर नवरात्र उत्सवातील दुर्गा मूर्तींचं विसर्जन व छटपूजासांरखे कार्यक्रम देखील पर्यावरणपूरक होणार आहेत. गणेश विसर्जनादरम्यान तलावात बुडून होणारे मृत्यू आणि दुर्घटना टळणार आहेत. जालना शहरात तयार झालेला हा विसर्जन कुंड फारच भव्य आहे. यापूर्वी कोणत्याही जिल्ह्यात अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे जालन्यातील नागरिकांनी या कुंडाची निगा आणि स्वच्छता ठेवली पाहिजे, असं मत एका नागरिकाने व्यक्त केलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
September 06, 2025 11:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Visarjan 2025: जालन्यात गणपती विसर्जनासाठी वेगळा प्रयोग, महापालिकेनं नेमकं काय केलं?

