Kalyan-Dombivli: बाप्पाच्या विसर्जनावर महापालिकेचा वॉच! विसर्जनस्थळी कशी केली तयारी?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या हद्दीत गणपती विसर्जनासाठी नियोजन केलं आहे.
कल्याण: गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज (6 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठिकठिकाणी 10 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत देखील लाखो गणेश मूर्तींचं आज विसर्जन होणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था केली असून 38 प्रमुख विसर्जन स्थळांवर 212 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या हद्दीत गणपती विसर्जनासाठी नियोजन केलं आहे. एकूण 76 विसर्जन स्थळी 2 हजार 457 हॅलोजन, 558 एलईडी, 105 लाईटनिंग टॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, महापालिकेच्या 'विसर्जन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत अ, ब, क, ड व जे प्रभागात 65 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच फ, ग, ह, आय आणि ई या प्रभागातील 62 ठिकाणी व्यवस्था केली आहे.
advertisement
मुंबई हाय कोर्टाच्या आदेशानुसार, 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक आहे. या वर्षी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करावं, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
गणपतींचा प्रवास खड्ड्यांतूनच!
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्यासंदर्भात आयुक्तांनी बैठक घेतली होती. खड्डे बुजवण्याच्या कामात दिरंगाई केली तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची खैर केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला होता. मात्र, अजूही काही रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेलेले नाहीत. त्यामुळे गणरायाचं आगमन आणि विसर्जन हे खड्डेमय रस्त्यातून होत आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Sep 06, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan-Dombivli: बाप्पाच्या विसर्जनावर महापालिकेचा वॉच! विसर्जनस्थळी कशी केली तयारी?









