आर्थिक व्यवहार आणि राजकीय हेतूने प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा प्रकार घडवला असा आरोप घोगरे पाटील यांनी केला, त्यांचे आरोप आमदार चिखलीकर यांनी फेटाळून लावले. त्या घटनेची मला महिती नाही . या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. विना कारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ नाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले .
advertisement
चौकशीत सत्य बाहेर येईल : आमदार प्रताप पाटील चिखलीकर
माझे आणि जीवन घोगरे पाटील त्यांचे कोणतेच आर्थिक व्यवहार नाही . ते माझ्याच पक्षात असल्याने राजकीय वाद देखील नाहीत पण जीवन पाटील यांचे अनेकाशी व्यवहार आहेत. लोकांचं देणं झालं त्यांच्यावर , त्यातून काही घडल का याची माहिती घेऊ असं चिखलीकर म्हणाले. तसेच जीवन घोगरे पाटील त्यांचा अपहरण प्रकरणाशी माझा काही संबंध नाही , चौकशीत सत्य बाहेर येईल असंही आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.
नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास नांदेडच्या सिडको परिसरात ही घटना घडली. जीवन घोगरे पाटील हे कामानिमित्त घराबाहेर पडले असताना चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सिडको भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. अपहरणानंतर जीवन घोगरे पाटील यांना अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीमुळे ते गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली
