मॉर्निंग वॉकला निघाले आणि…
आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सचिन गुजर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. याच वेळी दोन व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून अपहरण केल्याचा आरोप आहे. काही तासांनंतर त्यांना मारहाण झालेल्या अवस्थेत सोडून दिल्याचं समोर आलं आहे.
हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप
संबंधित व्यक्ती हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप केला जात आहे. अपहरण आणि मारहाण या दोन्ही घटनांचे काही क्षण CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांचे कुटुंबीय आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव
पालिका निवडणुकीत आरोप–प्रत्यारोपाची मालिका सुरू असताना ही घटना घडल्याने राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीत प्रभाव टाकण्यासाठी विरोधी गटाने हल्ला घडवून आणला, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
