रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील खळबळजनक खुलासा केला. अजित पवारांना ५० कोटींसाठी मारलं का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच त्यांनी अपघाताच्या एक महिना आधी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख देखील केला आहे. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
अमोल मिटकरींनी नेमकं काय सांगितलं?
advertisement
न्यूज १८ मराठीशी बोलताना अमोल मिटकरींनी सांगितलं की, आम्हाला पहिल्या दिवसापासून संशय आहे की हा अपघात नाही, तर हा घातपात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे. सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. व्हीएसआर कंपनीने पिंकी माळीच्या वडिलांना काहीच मदत केली नाही. वीएसआर कंपनीने केवळ पायलटचा विमा काढला होता. तोही डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीत अपघात झाला. त्यामुळे मला हा अपघात पायलटला पैशांचं आमिष दाखवून हिप्नोटाईज करून केलेला घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे.
तसेच मी रोहीत पवार यांच्या मताशी सहमत आहे. केंद्राने मोठ्या एजन्सींकडून अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करावी आणि हा सगळा तपास केला जावा. आमचा सीआयडीवर विश्वास आहे, पण त्यांच्या तपासाला मर्यादा आहेत, असंही मिटकरांनी म्हटलं आहे.
५० कोटींच्या विम्यासाठी अजितदादांना मारलं का?
तसेच अमोल मिटकरींनी चार दिवसांपूर्वी एक ट्विटही केलं होतं. ज्यात त्यांनी VSR कंपनीने डिसेंबर 2025 च्या महिन्यात आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा उतरवल्याची माहिती दिली होती. ही माहिती विश्वसनीय सुत्रांकडून दिल्याचं देखील त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं होतं. आता या सगळ्या घटनाक्रमानंतर ५० कोटींच्या विम्याच्या पैशांसाठी हा अपघात घडवून आणला का? असा संशय व्यक्त केला जातोय.
