पुण्यात अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी वाल्मिक कराडने शेतकऱ्यांची फसवणूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना केला होता. यावर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री यांनी कराड प्रकणात चौकशी सुरू केली आहे. त्यामध्ये एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन अशा तीन चौकशा लावल्या आहेत. त्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सीएम म्हणताय,सगळ्या चौकशी सुरु आहेत,असे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
पुढे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर विचारले असता अजित पवार भडकले, अररे कितीदा तेच तेच सांगायचं, चौकशीला सामोरे गेल. तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं की होईल ना, तुझं जर नाव नसेल तर तुझी चौकशी बळबळ करतील का रे...काय तुम्ही पण असं म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला.
अजित पवार यांनी वाहतूक कोंडी देखील प्रतिक्रिया दिली. लोकांनी वाहतूक शिस्त पाळले पाहिजे पाच एक हजार रुपये दंड करण्याचा विचार, प्राथमिक चर्चा सुरू आहेत गडकरींची मानसिकता ते आहे देशाचं काम बघत आहे ते, टोल ट्राफिक गर्दी हे टाळण्यासाठी बरेचसे टोल काढलेले आहेत, उड्डाणपूल किंवा इतर काय करता येईल का याच पण चर्चा सुरू असे त्यांनी सांगितले.तसेच रिंग रोड बाबत लवकरच निर्णय होईल,मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेईन. आणि पुरंदर एअरपोर्ट बाबत बैठक झाली आहे,कुठलाही एखादा प्रकल्प करताना लोकांचा विचार करावा लागतो, पुढील अनेक वर्षांचा विचार करून काम करायला लागेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
