खरं तर आज नवीन वर्षाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यासाठी अजित पवारांच्या आईने विठुरायाला साकडे घातले आहे. दर्शन झाल्यानंतर आशाताई पवार यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी साकडं घातल्याची माहिती दिली.
advertisement
अजितदादाला नवीन वर्ष सुखी सुखी जाऊदे. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्रित यावेत यासाठी आपण आज विठुरायाला साखरे घातल्याचे अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी सांगितले. पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब गुण्यागोविंदाने नांदावे असे आपण विठुरायाकडे साकडे घातले असल्याचे आशाताई पवार यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईनेही वाद मिटवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाजी गरज असल्याचे रोहित पवारांच्या आईने म्हटले होते.
दरम्यान गेल्या वर्षी अजित पवारांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावरच दावा सांगितला आहे. हे प्रकरण नंतर कोर्टात गेलं होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आलं होतं. तर शरद पवार यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आणि तुतारी चिन्ह देण्यात आलं होतं. याच चिन्हावर दोन्ही पक्षानी निवडणूक लढवल्या होत्या.
