TRENDING:

Ajit Pawar Plane Crash: व्हीएसआर कंपनी, डीजीसीए आणि 'तो' अपघात... गुप्तवार्ता विभागाच्या हाती काय लागलं? आज गुप्तवार्ता विभागाची पत्रकार परिषद

Last Updated:

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघात प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.राज्य गुप्तवार्ता विभागाचे (SID) अतिरिक्त पोलीस महासंचालक आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघात प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे. या अपघाताबाबत राज्य गुप्तवार्ता विभागाचे (SID) अतिरिक्त पोलीस महासंचालक आज दुपारी ३ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत तपासाबाबतचे अत्यंत गोपनीय आणि महत्त्वपूर्ण तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.
व्हीएसआर कंपनी, डीजीसीए आणि 'तो' अपघात... गुप्तवार्ता विभागाच्या हाती काय लागलं? आज गुप्तवार्ता विभागाची पत्रकार परिषद
व्हीएसआर कंपनी, डीजीसीए आणि 'तो' अपघात... गुप्तवार्ता विभागाच्या हाती काय लागलं? आज गुप्तवार्ता विभागाची पत्रकार परिषद
advertisement

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मागील काही दिवसांपासून विमान अपघात प्रकरणात तांत्रिक माहिती सादर करत अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अजित पवार यांनी व्हीएसआर कंपनीचे विमान वापरलं होतं. या विमानाला अपघात झाला. व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएच्या अधिकाऱ्यांचं साटंलोटं असल्याचा आरोप करण्यात आला. रोहित पवार यांनी या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीसह इतरांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे आणि पुण्यातील बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवारांनी ठिय्या एफआयआरसाठी आक्रमक भूमिका घेतली. मात्र, त्यांची तक्रार नोंदवण्यात आली. एफआयआर घेण्यात आला नाही.

advertisement

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देणार असल्याचे समजते.

राज्याचे लक्ष तपासाकडे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ना खत, ना पाणी, नुसत्या हवेवर पिकतोय गहू, सांगलीच्या खास शेतीचा Ground Report
सर्व पहा

अजित पवार यांच्या निधनानंतर हा केवळ अपघात होता की घातपात, याबाबत राजकीय वर्तुळात आणि जनतेत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि व्हीएसआर कंपनीवर झालेले आरोप या पार्श्वभूमीवर गुप्तवार्ता विभाग काय माहिती समोर ठेवणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: व्हीएसआर कंपनी, डीजीसीए आणि 'तो' अपघात... गुप्तवार्ता विभागाच्या हाती काय लागलं? आज गुप्तवार्ता विभागाची पत्रकार परिषद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल