रनवेची दृश्यमानता कमी होती, साधारणतः पाच किलोमीटर दृश्यमानता आवश्यक होती. दृश्यमानता 3 किलोमीटरपर्यंत असल्याची माहिती नियंत्रकाने कॉकपिटला कळवली. त्यावेळी विमानाने पुन्हा एक वळण घेतलं. त्यानंतर रनवे दिसतोय असं नियंत्रकाला सांगण्यात आलं. मग लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला. त्यानंतर लँडिंगवेळी 'ओह शीट, ओह शीट' हे शब्द ऐकू आले. तसेच या विमानातील दोन्ही पायलटनी मद्यपान केलं नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
advertisement
विमानातून शेवटी काय संवाद झाला?
DGCA ने दिलेल्या अहवालानुसार पायलट आणि बारामतीच्या एटीसीचा संवाद समोर आला आहे. सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी रनवे दिसत नसून तो दिसल्यावर कळवतो असे पायलट म्हणाला. त्यानंतर 28 सेकंदानंतर पायलटने एटीसीला रनवे दिसत असल्याचे सांगितले. 4 सेकंदात एटीसी वाऱ्याचा वेग शांत असून सुरक्षीतरित्या लॅण्डिंग करू शकता असा मेसेज देण्यात आला. मात्र अवघ्या 14 सेकंदात ओ शिट.. ओ शिट असा आवाज आला
14 सेकंदात काय घडलं?
इंजिन बिघाड, हवामानातील गंभीर परिस्थिती, विमानातील तांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय
आणीबाणी यासारख्या परिस्थितीमध्ये MAYDAY कॉल दिला जातो. मेडे कॉल हा शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत जिथे धोक्याची शक्यता वाटते, तिथे वैमानिक मेडे कॉल देतो. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात मेडे कॉल हा तात्काळ गंभीर संकटाचा इशारा मानला जातो. DGCA ने दिलेल्या टाईमलाईनुसार 8.43. 59 पर्यंत सर्व व्यवस्थित होते. मात्र अवघ्या 14 सेकंदाच असं काय घडलं की वैमानिकाला मे डे हा कॉल देखील देता आला नाही, याच गूढ अद्याप कायम असून त्याचा तपास सुरू आहे.
| Time | Pilot / Aircraft Communication | ATC Response |
|---|---|---|
| 08:43:27 | CALL YOU RUNWAY IN SIGHT VSK | -- |
| 08:43:28 | -- | COPIED |
| 08:43:55 | FIELD IN SIGHT VSK | 12 |
| 08:43:59 | -- | VSK WINDS CALM RUNWAY 11 CLEARED TO LAND |
| 08:44:13 | OH ST OH ST... | -- |
दोन्ही पायलटचे ब्रेथ अॅनालायझर टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह
अपघाताच्या दिवशी दृश्यमानता 3 हजार मीटर इतकी होती आणि विमान झाडावर धडकल्यानंतर जमिनीवर कोसळल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्याचसोबत फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरमधील डेटा डाऊनलोड करण्यात यश आलं असून, प्राप्त झालेल्या डेटाची पडताळणी सुरू असल्याचंही अहवालात म्हंटलंय. विशेष म्हणजे दोन्ही पायटलची अपघाताआधीची ब्रेथ अॅनालायझर टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचंही अहवालातून समोर आलं आहे.
