TRENDING:

APMC Market : आल्याला 6500 रुपये भाव, डाळिंबचे दरही तेजीत, द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं पाहा

Last Updated:

महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : राज्यातील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची कृषी आवक होत असते. शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात.
advertisement

आल्याच्या दरात सुधारणा

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 999 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 602 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4500 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक भाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 30 क्विंटल आल्यास 3500 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

Holi 2026: कोकणवासीयांची 'लालपरी'ला पसंदी, ज्यादा बसेसही झाल्या हाऊसफुल्ल...

advertisement

द्राक्षाची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज 195 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सांगली बाजारात आवक झालेल्या 69 क्विंटल द्राक्षास 3000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 66 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 6000 ते 9000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

डाळिंब दराची लाली वाढली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याला 6500 रुपये भाव, डाळिंबचे दरही तेजीत, द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं पाहा
सर्व पहा

आज राज्याच्या मार्केटमध्ये 435 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर बाजारात 175 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 51 क्विंटल डाळिंबास 13500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : आल्याला 6500 रुपये भाव, डाळिंबचे दरही तेजीत, द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल