TRENDING:

'तू आधी टेक ऑफ घे, बाकी...', विमान मालकाचा पायलटला आदेश? रोहित पवारांकडून नवा खुलासा

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता नवा खुलासा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ते सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. त्यांनी अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर विमान कंपनीवर अनेक आरोप केले आहेत. तसेच या विमान कंपनीचे मालक व्हीके सिंग याला बड्या राजकीय नेत्यांकडून वाचवलं जात आहे? असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यांनी सीआयडी तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शिवाय अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीबीआय आपल्याकडे का घेत नाहीये, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
News18
News18
advertisement

दरम्यान, त्यांनी अजित पवारांच्या विमानाचं उड्डाण घेण्याआधी काय झालं? याबाबतचा खुलासा केला आहे. विमानाचे मालक व्हीके सिंग यांनी दृश्यमानता कमी असताना देखील विमानाचं टेक ऑफ करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप केला आहे. तू आधी टेक ऑफ घे, बाकी नंतर बघून घेऊ, असा थेट आदेश व्हीके सिंगने पायलटला दिला होता, असा नवा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना रोहित पवारांनी हा नवा आरोप केला आहे.

advertisement

यावेळी रोहित पवार म्हणाले की, ज्यावेळी अजित पवारांचं विमान उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालं होतं. तेव्हा वातावरणात दृश्यमानता कमी होती. ही बाब पायलटने व्हीके सिंग यांना कळवली होती. पण सिंग याने पायलटला टेक ऑफ करण्याचे आदेश दिले. "तू टेक ॲाफ घे, बाकी नंतर आपण बघू" असं व्हीके सिंगने पायलटला म्हटल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. मात्र याबाबत कोणताही पुरावा त्यांनी सादर केला नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 बहिणी बनल्या बॉस, नोकरी अन् शिक्षण सांभाळत करतात मोमोज व्यवसाय, इतकी कमाई
सर्व पहा

रोहित पवार पुढे म्हणाले, पायलटच्या रक्तात दारू किंवा विष काहीच नव्हतं. मग पायलटवर दबाव होता का? व्ही के सिंग ला का वाचवलं जातंय? अजितदादांचं विमान पडलं की पाडलं गेलं? याचं उत्तर आम्हाला हवंय. व्ही के. सिंग कुणाचं तरी नाव घेईल, म्हणून त्याला वाचवलं जातंय का? असा सवालही त्यांनी विचारला. रोहित पवारांच्या नव्या आरोपांमुळे आता हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तू आधी टेक ऑफ घे, बाकी...', विमान मालकाचा पायलटला आदेश? रोहित पवारांकडून नवा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल