advertisement

Success Story : 2 बहिणी बनल्या बॉस, नोकरी अन् शिक्षण सांभाळत करतात मोमोज व्यवसाय, महिन्याला इतकी कमाई

Last Updated:

दिव्या आणि निकिता नेरुळकर या दोन बहिणींनी स्वतःच्या मेहनतीवर एक प्रेरणादायी व्यवसाय उभा केला आहे. दोघींनी मिळून पार्ट टाइम मोमोजचे फूड कार्ट सुरू केले असून त्यावर त्या व्हेज आणि नॉनव्हेज मोमोज विकतात.

+
News18

News18

ठाणे : सध्याच्या घडीला अनेक जण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. दिव्या नेरुळकर आणि निकिता नेरुळकर या दोन बहिणींनी स्वतःच्या मेहनतीवर एक प्रेरणादायी व्यवसाय उभा केला आहे. दोघींनी मिळून पार्ट टाइम मोमोजचे फूड कार्ट सुरू केले असून त्यावर त्या व्हेज आणि नॉनव्हेज मोमोज विकतात. संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत त्यांचा स्टॉल सुरू असतो. नोकरी आणि शिक्षण सांभाळत त्यांनी हा व्यवसाय उभा केला आहे, त्यामुळे त्यांची जिद्द आणि मेहनत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दिव्या एका खासगी कंपनीत नोकरी करते तर निकिता कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दिव्याला सुरुवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. मात्र नोकरीमुळे वेळ मिळत नसल्याने ते शक्य होत नव्हते. अशा वेळी तिच्या बहिणीने आणि आई-वडिलांनी तिला मोठा आधार दिला. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच हा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
दररोज संध्याकाळी दिव्या जॉबवरून येण्यापूर्वीच फूड कार्ट सुरू केले जाते. त्या वेळी तिची बहीण निकिता आणि त्यांचे वडील स्टॉलवर उभे राहून ग्राहकांना सेवा देत असतात. दिव्या कामावरून परतल्यानंतर तीही त्यांना जॉइन होते. दिव्या सांगते, दिवसभराच्या कामानंतर आणि प्रवासामुळे मी खूप थकलेली असते. पण कार्टवर आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि सगळा थकवा दूर होतो. निकिता देखील कॉलेजमधून परतल्यावर स्टॉलवर येते. ती म्हणते ताईने पाहिलेलं स्वप्न आम्ही दोघी मिळून पूर्ण करत आहोत. मला देखील व्यवसायाची खूप आवड आहे आणि भविष्यात हा व्यवसाय अजून मोठा करायचा आहे.
advertisement
आज या दोन्ही बहिणी पार्ट टाइम व्यवसायातून दरमहा सुमारे 70 हजार रुपये कमावत आहेत. या यशाचे सर्व श्रेय त्या आपल्या कुटुंबाला देतात. मात्र हा प्रवास इतका सोपा नव्हता. ज्या ठिकाणी त्या फूड कार्ट लावतात तो परिसर काहीसा असुरक्षित असल्याचे त्या सांगतात. रात्री 10-11 वाजेपर्यंत स्टॉल सुरू असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दोन मुली असल्यामुळे काही वेळा मुलांकडून त्रासही सहन करावा लागतो.
advertisement
तरीही या दोघी बहिणी हार मानण्यास तयार नाहीत. आमचा हा छोटासा व्यवसाय आम्ही नक्कीच पुढे नेणार, असा विश्वास त्या व्यक्त करतात. दिव्या आणि निकिता तरुणांना संदेश देताना म्हणतात, स्वतःचे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आम्ही इतक्या लहान वयात हे करू शकतो तर तुम्हीही नक्की करू शकता. जिद्द आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळते.
advertisement
सध्या त्यांचा मोमोज फूड कार्ट चाळ क्रमांक 1, अष्टविनायक को-ऑप. हाउसिंग सोसायटी, दिवा-आगासन रोड, दातीवली तलाव समोर, विकास म्हात्रे नगर दिवा, ठाणे संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू असतो. येथे परिसरातील अनेक ग्राहक दररोज त्यांच्या मोमोजचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.
view comments
मराठी बातम्या/Food/
Success Story : 2 बहिणी बनल्या बॉस, नोकरी अन् शिक्षण सांभाळत करतात मोमोज व्यवसाय, महिन्याला इतकी कमाई
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement