आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार विमान अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या मालकाची चौकशी करू नका, अशी भूमिका शरद पवार गटाच्या नेत्यानं केली आहे. व्हीएसआर कंपनीचा मालक अपघाताबाबत लपवाछपवी करत आहे, ते पायलटवर अपघाताची जबाबदारी ढकलून मोकळे होतील, त्यामुळे त्याची चौकशी करू नका, अशी मागणी प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.
advertisement
अजितदादांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया देताना सुनील माने म्हणाले, "व्हीएसआर कंपनीचा मालक अजितदादांच्या विमान अपघाताबाबत लपवाछपवी करतोय. सीआयडीही त्याला साथ देतेय, असं आता आम्हाला वाटत आहे. आधी पुण्यातील सीआयडी हेडक्वार्टरमध्ये त्याची चौकशी झाली. आता मुंबईत त्याची चौकशी होत असल्याचं आम्हाला समजत आहे. या प्रकरणाकडे लोकांचं आणि माध्यमांचं लक्ष जाऊ नये, म्हणून ही लपवाछपवी केली जातेय का? असा आमचा प्रश्न आहे."
"हा व्हीके सिंग अतिशय बदमाश माणूस आहे. अजित दादांच्या विमानाचं मेंटनन्स न करता किंवा अन्य काही गुन्हेगारी पद्धतीने घातपात केलाय, असा आमचा आरोप आहे. त्यामुळे त्या पद्धतीने गुन्हेगारी तपास झाला पाहिजे. अशी आमची मागणी आहे. सीआयडी केवळ चौकशी करण्याचा दिखावा करतंय, असं आम्हाला वाटत आहे. लोकांचं लक्ष हटवण्याचा यामागे अजेंडा दिसत आहे", असंही सुनील माने म्हणाले.
"यात माझी काही चूक नाही, केवळ पायलटची चूक आहे, असं तो सतत सांगतोय, असंही आम्हाला कळलं आहे. अहमदाबाद विमान अपघातात देखील ३०० लोकांच्या मृत्यूला पायलटला कारणीभूत धरण्यात आलं. यामुळे इश्युरन्सचे पैसे मिळतील, विमान कंपन्यांचा मालक सुरक्षित राहिल, हाच अजेंडा आणि मोडस ऑपरेंडी व्हीके सिंगची आहे," असा आरोपही सुनील मानेंनी केला.
