TRENDING:

Navratri 2025: चौकाचौकात घडणार अंबाबाईचं दर्शन! कसा आहे कोल्हापूर देवस्थानचा विशेष उपक्रम ?

Last Updated:

Navratri 2025: नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (22 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या अंबाबाईची नगरी म्हणजेच कोल्हापूर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. उत्सवासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा पोलीस आणि महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. नवरात्रीच्या काळात कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना देवीचं सहज दर्शन घडावं, यासाठी मंदिर प्रशासनाने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
Navratri 2025: चौकाचौकात घडणार अंबाबाईचं दर्शन! कसा आहे कोल्हापूर देवस्थानचा विशेष उपक्रम
Navratri 2025: चौकाचौकात घडणार अंबाबाईचं दर्शन! कसा आहे कोल्हापूर देवस्थानचा विशेष उपक्रम
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी तोफेच्या सलामीने अंबाबाईच्या मंदिरात घटस्थापना झाली. त्यानंतर देवीचं दर्शन सुरू झालं आहे. नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. अनेकांना अंबाबाई मंदिरापर्यंत जाणं आणि कित्येक तास दर्शनरांगेत उभं राहणं शक्य होत नाही. अशा सर्व भाविकांना तसेच स्थानिक कोल्हापूरकरांना ते जिथे असतील तिथे अंबाबाईचे दर्शन घडावे, यासाठी शहरात ठिकठिकाणी 15 स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर देवीच्या पूजेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

advertisement

Navratri 2025: शारदीय नवरात्र म्हणजे काय? 9 दिवस उपवास का करतात? पूजा, विधी आणि महत्त्व

या ठिकाणी लागणार स्क्रीन

अंबाबाई मंदिर परिसरात 3, शेतकरी बझार दर्शन मंडपामध्ये 3, पूर्व दरवाजासमोरील दर्शन रांगांमध्ये 2, घाटी दरवाजा, बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगावेश, मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, खासबाग खाऊ गल्ली रेणुका मंदिर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, त्र्यंबोली मंदिर, जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिर इत्यादी ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

advertisement

अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली

120 पीटीझेड, आयपी कॅमेरा, 5 डोअर मेटल डिटेक्टर, 5 एचएचएमडी, 15 वॉकी टॉकी, 3 एक्स-रे बॅगेज स्कॅनर, 1 ड्रोन कॅमेरा, 4 फिक्स एलईडी स्क्रीन, सोशल मीडिया लाईव्ह, पालखी दर्शन, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, सीसीटीव्हींना एआयची जोड, अशा अत्याधुनिक साधनांच्या मदतीने अंबाबाई मंदिरावर लक्ष ठेवलं जाणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: चौकाचौकात घडणार अंबाबाईचं दर्शन! कसा आहे कोल्हापूर देवस्थानचा विशेष उपक्रम ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल