Navratri 2025: शारदीय नवरात्र म्हणजे काय? 9 दिवस उपवास का करतात? पूजा, विधी आणि महत्त्व

Last Updated:
Navratri 2025: महाराष्ट्रात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये शारदीय नवरात्रौत्सवाचाही समावेश आहे. नवरात्रीत घटस्थापना करून उपवास केले जातात. यंदा सोमवारपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर घटस्थापना आणि उपवासाचं महत्त्व याठिकाणी सांगितलं आहे.
1/5
दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी या काळात शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना आणि 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे. नवरात्रौत्सवात नऊ दिवस देवीची पूजाअर्चा करून, व्रत-उपवास करून भक्तिभावाने आणि शुध्द अंतःकरणाने देवीची आराधना केली जाते.

advertisement
2/5
नवरात्रौत्सवातील घटस्थापनेचा पहिला दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी घरोघरी मातीच्या घटांची स्थापना केली जाते. यामध्ये ताम्हणात किंवा बांबूच्या टोपली माती पसरून त्याच्यामध्ये आपल्या कुलदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते.

3/5
अगदी स्वच्छ करून निवडून घेतलेल्या मातीच्या घटात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्य पेरली जातात. या घटाला 9 दररोज वेगवेगळ्या पानाफुलांची माळ घातली जाते. घटाजवळ नवरात्रीत दिवस-रात्र नंदादीप तेवत ठेवला जातो. हा देखील नवरात्रौत्सवाच्या व्रताचाच एक भाग आहे.

4/5
नवरात्र महोत्सवात 9 दिवसांच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या नियमांनी हे उपवास पूर्ण करतात. काहीजण नऊ दिवस एक भुक्त म्हणजे फक्त एक वेळ जेवण करतात. काहीजण नऊ दिवस पूर्णपणे उपवास धरुन व्रत पूर्ण करतात. काही ठिकाणी प्रतिपदा आणि अष्टमी या दोन दिवशी उपवास करुन देवीची उपासना केली जाते.

5/5
नवरात्राच्या नवव्या माळेला खंडेनवमी असे म्हणतात. या दिवशी घरातील सर्व शस्त्रे, यंत्र आणि पुस्तकांची म्हणजेच विद्येची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बऱ्याच कामाच्या ठिकाणी देखील यादिवशी मशीन्स पुजली जातात. तर दुसऱ्या दिवशी अर्थात दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असतो. या दिवशी आपट्याच्या किंवा शमीच्या झाडाची पानं एकमेकांना दिली जातात.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement