अमित शाह नांदेड दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. तर, दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला होता. मात्र, ऐनवेळी शाह यांचा दौरा आता रद्द झाला आहे.
मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील दिग्गज उपस्थित राहणार
अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असला तरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.
advertisement
मुंबई महापौर निवडीचा पेच सुटणार?
या दौऱ्याकडे केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता, राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात होते. मुंबई महापौर पदाची निवड आणि महायुतीमधील सत्ता वाटपाच्या मुद्द्यावर अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नांदेडमध्ये महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, शहा अनुपस्थित राहणार असल्याने आता ही चर्चा लांबणीवर पडणार की मुंबईत पार पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सत्ता वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या महापालिकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
