भाजप खासदारांनी बच्चू कडू यांना डिवचलं
बच्चू कडू हे चारदा सतत निवडून आलेले आहेत. आमदार कडू यांना अहंकार, गर्व आहे. मात्र, गर्वाचे घर कधी खाली असते. आपल्याला कोणी पाडणार नाही, या भ्रमात बच्चू कडू यांनी राहू नये. जनताच पाडत असते, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काल (शनिवार) केले.
advertisement
आमदार बच्चू कडू यांचा जोरदार पलटवार
खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर गप्प बसतील ते बच्चू कडू कसले? त्यांनीही बोंडे यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहेत. कडू म्हणाले, की अनिल बोंडे तुम्ही नवख्या उमेदवाराकडून पडले. त्यामुळे जनतेने दाखवलं आहे, गर्व कोणाला आहे. अनिल बोंडे कसे पडले हे मला माहित आहे, अनिल बोंडे यांनी मला फोन केला होता, आम्हाला पाठिंबा द्या, पण बच्चू कडू कधीच पाठिंब्यासाठी फोन करत नाही. मला गर्व नाही, मला शेतकरी, मजूर मतदारांवर आत्मविश्वास आहे. मी निवडून येणार हे नक्की. सोबत राहून अफजलखानासारखी मिठी मारण्याचा प्रकार भाजपने थांबवावा, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
वाचा - 'फडणवीसांवर होत असलेल्या अन्यायामुळे वेदना', सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत चर्चा करण्यापूर्वी त्यांनी इथल्या स्थानिक भाजप कार्यकर्ते मला मुद्दाम अडचण निर्माण करण्याचं काम करत आहे त्यांना थांबवलं पाहिजे. भाजप पक्ष मोठा आहे हे मान्य आहे, पण तुमच्या सोबत राहून आम्हाला पाडण्याचे मनसुबे तुम्ही जर आखत असाल तर, आमच्या हाती पण महाराष्ट्रात काहीतरी असेल ना? तुमच्यामुळे आम्ही पडू पण आम्हीही कोणाला तरी पाडण्याची ताकद ठेवू, असा थेट इशारा-बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे.
शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या कडू आणि भाजपमधील संघर्ष मिटला नाही तर त्याचा फटका निश्चितच 2024 भाजपला बसू शकतो. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संघर्षात लक्ष घालण्याची गरज आहे.