अमरावती - महाराष्ट्र हे विविध आणि अत्यंत चविष्ट अशा खाद्यपदार्थांनी संपन्न असे एक प्रमुख राज्य आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रत्येक असे काही खास पदार्थ आहेत. विदर्भ म्हटल्यावर सर्वात आधी सावजीची आठवण येते. पण याच विदर्भामध्ये आणखी एक पदार्थ प्रसिद्ध आहे, तो म्हणजे आलुपोंगा.
पाऊस पडला की चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण नेहमी पकोडे आणि इतर अती तेलाचे पदार्थ खाणे योग्य नाही. तेव्हा तुम्ही अमरावती स्पेशल आलू पोंगा नक्की ट्राय करू शकता. आलू पोंगा खायला खूप टेस्टी लागतो. सायंकाळच्या वेळी जास्तीत जास्त करण्यात येणारा हा आलू पाँगा नेमका कसा बनवायचा, ते आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
साहित्य : उकडलेले बटाटे, शेव, पिंगर (पोंगे), बारीक चिरलेल्या कांदा, कांदा, चाट मसाला, धनिया पावडर, मीठ.
कृती : सर्वात आधी बटाटे उकळून घ्यायचे. त्यानंतर आणलेले पिंगर तळून घ्यायचे. उकडलेले बटाटे बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात कांदा आणि तिखट, मसाले घाला. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या.
त्यानंतर पिंगरमध्ये मिक्स केलेलं सारण दोन्ही बाजूने भरून घ्यायचं. ते भरून तयार झाल्यानंतर त्यावर शेव, बारीक कांदा, कोथिंबीर घालून ते खाण्यासाठी तयार होते.
पावसात सोयाबीनची छाटणी करावी की नाही, कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला अत्यंत महत्त्वाचा सल्ला, VIDEO
आलू पोंगा तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. मार्केटमध्ये अनेक फ्लेवरचे पिंगर मिळतात. तुम्ही कोणतेही वापरू शकता. आलू पोंगा टेस्टी आणि चटपटीत असल्याने सर्वजण आवडीने खातात. तर मग तुम्हालाही विदर्भातील ही रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही नक्कीच या पदार्थाची चव चाखू शकता.