अमरावती - नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजारातही खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहेत. नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. यात उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, वरईचा भात हेच आपल्याला सर्वात आधी आठवते.
उपवासाचे हे सर्व आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही. त्यामुळे उपवासासाठी फराळी चिवडा जर आपण बनवला तर तो स्टोअर पण करू शकतो आणि तोंडाची चव सुद्धा बदलते. त्यामुळे हा उपवासासाठी फराळी चिवडा नेमका कसा बनवतात, याची रेसिपी आपण जाणून घेऊयात.
advertisement
फराळी चिवडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य : 1 वाटी नायलॉन साबुदाणा, उपवासाचे पोहे, शेंगदाणे, बटाटा चिप्स वाळवलेले, लाल तिखट, मीठ.
कृती :- सर्वात आधी तेल तापवून घ्यावे. तेल तापल्यावर त्यात साबुदाणा तळून घ्यावे. नंतर पोहे, शेंगदाणे, चिप्स सर्व तळून घ्यावे. तळून झाल्यानंतर ते एकत्र करून मिक्स करावे. नंतर त्यात मीठ आणि तिखट घालावे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करावे. त्यात तुम्ही सेंधी मीठ आणि जिरेपूड सुद्धा घालू शकता.
यानंतर हा फराळी चिवडा तयार होईल. विशेष म्हणजे तुम्ही हा चिवडा 4 ते 5 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. तर मग तुम्हालाही उपवासाला हा फराळी चिवडा तयार करायचा असेल तर ही झटपट रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करू शकता.