न्यूज18 लोकलच्या टीमने मूळ अमरावती येथील रहिवासी आणि सध्या ठाणे येथे स्थायिक झालेल्या अॅडव्होकेट ऊर्वी केचे यावलीकर यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी याबाबतची सर्व माहिती दिली.
पेटंट म्हणजे काय?
पेटंट हा एक कायदेशीर अधिकार आहे जो अनेक देशांमध्ये अस्तित्त्वात आहे, जो शोध व आविष्कारासाठी दिला जातो. हा अधिकार सरकारद्वारे Patent Owner ला मर्यादित कालावधीसाठी दिला जातो. फक्त Patent Owner च त्याच्या अविष्काराचे उत्पादन आणि विक्री करू शकेल आणि त्याच्या संमतीशिवाय कोणीही तो शोध वापरल्यास तो व्यक्ती कायदेशीर कार्यवाहीसाठी जबाबदार राहील.
advertisement
पेटंट कायद्याचे उद्देश काय? हा कायदा कशासाठी अस्तित्वात आला?
सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन उत्पादनांच्या आविष्कारकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना विशेष अधिकार देण्यासाठी Patents Act 1970 हा कायदा अस्तिवात आला आहे. पण भारत हा World Trade Organization (WTO) चा सदस्या असल्यामुळे TRIPS म्हणजे Trade-Related Aspects of Intellectual Property Rights या international legal agreement मध्ये भारताचा सहभाग होता. या agreement नुसार 2005 मध्ये Patents Act मध्ये सुधार करण्यात आला. त्यानुसार या कायद्यामध्ये कलम 3 (डी) याचा समावेश करण्यात आला आणि भारत लवकरच स्वस्त औषधांचा एक मोठा पुरवठादार बनला.
पेटंट हे 20 वर्षांसाठी देण्यात येते. पण काही औषध कंपन्या औषधामध्ये थोडाफार बदल करून पेटंट renew करून घेत असत. त्यामुळे ever-greening of drug patents हा प्रकार वाढला होता. म्हणजे ते संशोधन कधी समाजासाठी खुलेच होत नव्हते. पण कलम 3 (डी) नुसार पदार्थाच्या कार्यक्षमतेमध्ये भरपूर वाढ झाल्याशिवाय पेटंट renew करण्याचे नाकारण्यात आले आहे. ते संशोधन सर्वांसाठी खुले झाले. त्यामुळे भारतामध्ये generic medicine चे उत्पादन वाढले. आणि चांगल्या प्रतीच्या औषधी अगदी स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.
पेटंट कशासाठी मिळू शकतो आणि कशासाठी मिळू शकत नाही?
पेटंट हा नवीन संशोधनासाठी देण्यात येतो. Patents Act, 1970 मध्ये निकष देण्यात आला आहे की, संशोधन हे नाविन्यपूर्ण असावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला औद्योगिक उपयोगिता असावी. हे निकष पूर्ण करणाऱ्या शोधाला पेटंट मिळू शकते. पण जर शोध हा फसवून करणारा असेल, नैतिकदृष्ट्या चुकीचा असेल, निसर्गात अगोदरच अस्तिवात असलेल्या वैज्ञानिक तत्वाज्ञाचा किंवा जीवाचा शोध असेल, जसा की Gravitational Force जो अगोदरच अस्तित्वात आहे. एखादा आधी कधी न पाहिलेला प्राणी असेल. हे invent नाही केल्या गेला आहे. अश्या गोष्टींना पेटंट मिळत नाही. किंवा काही पदार्थ फक्त एकत्र केल्या गेले किंवा पुनर्रचना केल्या गेली. जसे की छत्रीला पंखा लावला तर अशा गोष्टींना पेटंट मिळत नाही. तसेच मानवी जीवनासाठी अत्यावशक शेतीच्या पद्धती, वैद्यकीय ऑपरेशन प्रक्रिया किंवा निदान वा उपचाराची पद्धत या गोष्टींना सुद्धा पेटंट मिळत नाही. यासोबतच आण्विक उर्जा म्हणजे atomic energy संबंधित संशोधनाला सुद्धा पेटंट मिळत नाही.
पेटंट कुठे व कसा रजिस्टर करावा?
पेटंट हे भारतीय पेटंट कार्यालय (Indian Patent Office) मध्ये रजिस्टर करण्यात येतो. पेटंट अर्ज एक तर संशोधक स्वतः किंवा त्यांनी नियुक्त केलाला व्यक्ति किंवा दोन संशोधक संयुक्तपणे देऊ शकतात. संशोधक स्वतः अर्ज सादर करत असल्यास त्याला Class III digital signature ची आवश्यकता आहे किंवा पेटंट एजंटद्वारे अर्ज करता येतं.
अर्ज हा संशोधन सुरू असतांना किवा पूर्ण झाल्यावर देता येतं. जर संशोधन सुरू असतांना अर्ज दिले गेले तर 12 महिनाच्या आत संशोधन पूर्ण करावे लागते. पण सुरवातीलाच जर अर्ज दिले तर पुढे संशोधनाचा दुरुपयोग होण्याचे प्रमाण फार कमी होते. अर्ज हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतं. आपल्यासारख्या संशोधनासाठी आधीच कोणी पेटंट घेतले आहे काही नाही हे तपासण्यासाठी पेटंट ऑफिस जर्नल ऑनलाइन पाहता येते.
पेटंट ऑफिसेस हे कोलकाता, नवी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे आहेत. त्यामुळे अर्ज जिथे राहत असेल किंवा व्यापार करत असेल किंवा जिथे संशोधन अस्तिवात आले असेल तशा अधिकार क्षेत्रानुसार या 4 पैकी एका ऑफिसमध्ये अर्ज देता येतं.
तुमचे अर्ज हे 18 महिन्यांपर्यंत गुप्त ठेवण्यात येते नंतर ते पेटंट ऑफिस जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येतं. पुढे पेटंट मिळण्यासाठी 46 महिन्यांच्या आत पेटंट Examination साठी विनंती करावी लागते. त्यानंतर Examination Report मध्ये कळवण्यात येते की, तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे की त्यावर काही हरकती घेण्यात आले आहेत. हरकती असतील तर पुढे तुम्हाला तुमच्या म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते. अशा प्रकारे पेटंट हे मिळू शकते.
पेटंट हा किती कालावधीसाठी मिळतो?
पेटंट अर्ज केल्याच्या तारखेपासून 20 वर्षाच्या कालावधीसाठी मिळतो. 20 वर्षानंतर ते संशोधन सगळ्यांसाठी मोकळे होऊन जाते. म्हणजे 20 वर्षानंतर ते संशोधन वापरण्यासाठी मालकाची परवानगी घेण्याची गरज नसते.
भारतात पेटंट रजिस्टर झाल्या असल्यास दुसऱ्या देशात तो परत रजिस्टर करावा लागेल का?
हो. पेटंट संरक्षण हा एक प्रादेशिक अधिकार आहे आणि म्हणूनच केवळ भारताच्या क्षेत्रामध्येच प्रभावी आहे. जागतिक पेटंटची कोणतीही संकल्पना नाही. पण भारतात अर्ज दाखल केल्यानंतर 12 महिन्यांच्या आत पिसीटी अतंर्गत अर्ज दाखल करता येतो. PCT म्हणजे Patent Cooperation Treaty ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी 1970 मध्ये अस्तिवात आली. यामध्ये 150 हून अधिक देश सहभागी आहेत. यानुसार सिंगल-इंटरनॅशनल पेटंट अर्ज या सगळ्या देशांमध्ये एकाच वेळी पेटंटसाठी अप्लाय करता येते.
पेटंट राइटचे उल्लंघन झाल्यास कुठे दाद मागावी?
पेटंट मालक, पेटंट राइटचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध पेटंट कायाद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करू शकतो. पेटंट राईट उल्लंघनासाठी जिल्हा न्यायालयात दाद मागता येते त्यातून संशोधनाचा गैरवापर थांबवता येतो तसेच नुकसानभरपाई सुद्धा मागता येते.
उर्वी केचे यावलीकर यांच्याबद्दल -
उर्वी केचे यावलीकर यांनी कायदा शाखेतील पदवीधर असून त्यांनी पदव्यत्तर पदवीचे (एलएलएम) शिक्षण राज्यघटना आणि प्रशासकीय कायदा या विषयात घेतले. सध्या त्या अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएचडी करत आहेत. त्यांनी त्यांची कारकीर्द ही एक असोसिएट म्हणून सुरू केली होती. यानंतर लवकरच त्या अस्ट्रिया लीगल असोसिएट्स एलएलपी येथे भागीदार बनल्या.
त्यांनी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात व्याख्याता आणि GTC अमरावती अंतर्गत अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही काम केले आहे. यासोबतच त्या अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत होत्या.
त्यांना महिला संबंधित कायदे, मानवाधिकार, महाविद्यालये, विद्यापीठे आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध, मानवी हक्क, पेटंट, कॉपीराइट, ग्राहक कायदा इत्यादी विविध कायदेशीर मुद्द्यांवर बोलण्यासाठी विविध नामांकित संस्थांमध्ये प्रमुख पाहुणे वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात येते.
