अमृता फडणवीस माध्यमांशी बोलत होत्या.यावेळी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. महायुती आता एकत्रित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची वाटचाल आजपासून सूरू केलेली आहे. याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढे अमृता फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचे जीवन संघर्षमय राहिले आहे, मी त्यांना जवळून पाहिलेले आहे. ते जे काय ठरवतात ते करून दाखवतात, अशी त्यांची जिद्द आहे. त्यांच्यात जिद्द, चिकाठी,धीर असे गुण आहेत त्यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे आज ते इथपर्यंत पोहोचलं आहे, असे कौतुक अमृता फडणवीस यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रासाठी त्यांना खूप काम करायच आहे.त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे, असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
advertisement
तसेच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद 2019 च्या निवडणुकीनंतर हुकल्यानंतर त्यांनी मी पुन्हा येईन असे विधान केले होते. या विधानावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी परत यायचं नाही आहे. तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, ते जे महाराष्ट्रासाठी करू शकतील ते कुणीही करू शकणार नाही. आणि लोकांच्या विश्वासामुळे ते पुन्हा येतायत, याचा मला आनंद असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे.
