राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या उज्वला थिटे यांची अनगर नगरपंचायत निवडणुकी संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नगराध्यक्षपदाची स्थगिती आहे त्याचा आनंदच म्हणावा लागेल. नियतीचे पण फासे फिरले आहेत. पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायचा. अर्ज भरताना अडथळे निर्माण केले आणि तांत्रिक कारणाने माझा अर्ज बाद केला, असे उज्वला थिटे म्हणाले.
advertisement
नेमकं काय म्हणाल्या उज्वला थिटे?
सोलापूर जिल्हा न्यायालयात गेल्यास तिथेही कागदपत्र गहाळ करण्यात आले आणि तिथे आमच्या विरोधात निकाल दिला. त्या निकालाची प्रत अजून आली नाही. ती परत आली की, उच्च न्यायालयात जाणार आहे. 20 तारखेपर्यंत या निर्णयाला स्थिती आहे.
उच्च न्यायालयात मागणी करणार जोपर्यंत उच्च न्यायालयाच्या निकाल परत माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत या निवडणुकीला स्थगिती द्यावी.
न्यायालयाने थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला
सोलापूर अनगर नगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुरस्कृत उमेदवार उज्वला थिटे यांचा नराध्याक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात उज्वला थिटे यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे .
उज्वला थिटेंचा अर्ज का बाद झाला?
बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सुचकाची सही नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज बाद केला होता. नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर जिल्हा न्यायालयात उज्वला थिटे यांनी अपील केली होती. उच्च न्यायालयात याचिका दाखल करता आली तर करणार आहे. जर उच्च न्यायालय नाही म्हणाले तर सुप्रीम कोर्टात जाईल' असं थिटे यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा :
