वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी आज नांदेडमध्ये मयत सक्षम ताटे याच्या कुटुंबाची आणि आंचलची भेट घेतली. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाचा खून झाला होता. दरम्यान आज अंजली आंबेडकर यांनी आंचलची भेट घेउन तिला धीर दिला. यावेळी संपूर्ण घटनाक्रम त्यांनी जाणून घेतला.
"मी खास आंचलला भेटायला आले. अश्या प्रसंगात ठाम राहणे हे सोप्प नाही. आपल्या प्रेमासाठी ठाम राहणं सोप्प नाहीये, खूप अशा केसेसमध्ये मुली बोलत नाहीत, म्हणून त्या केसेस हरल्या आहेत. तुझ्या सारखी जिद्द कुणीच दाखवली नाही, असं अंजली आंबेडकर म्हणाल्या.
advertisement
दरम्यान, जातीवरच्या वर्चस्वातून हा खून झाला. पण दुर्दैवाने त्या मुलाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीचा बाऊ केला जातोय. या प्रकरणाचा योग्य आणि निपक्ष तपास व्हावा. आंचल आणि ताटे कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत वंचित आघाडी कुटुंबासोबत असल्याचं आश्वासनही अंजली आंबेडकर यांनी दिलं.
आंचलच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचित आघाडीने घेतली आहे. वंचितचे प्रमुख ऍड प्रकाश आंबेडकर यांनी वकील म्हणून खटला चालवावा अशी कुटुंबाची मागणी आहे. ती मागणी आपणं साहेबाच्या कानावर घालणार असल्याचं, अंजली आंबेडकर यांनी सांगितलं.
घराची केली रेकी
दरम्यान, या प्रकरणातील आणखी काही आरोपी आहे. ते अजूनही बाहेरच आहे. त्यांनी घराबाहेर येऊन पाहणी केली. त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या आहे, असं सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांनी अंजली आंबेडकर यांच्या भेटीदरम्यान सांगितलं. या प्रकरणी पोलिसांना ताटे कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी करणार असल्याचं आश्वासन अंजली आंबेडकर यांनी दिलं.
