TRENDING:

Ashok Kharat Case: बायकोचंही ऐकलं नाही आणि मित्रांनाही जुमानलं नाही; अखेर खरात 'या' एका चुकीमुळे अडकला!

Last Updated:

Ashok Kharat Case: ज्याच्या एका शब्दावर नाशिकमधील मोठे अधिकारी आणि नेते लोटांगण घालत होते, तो भोंदू अशोक खरात आता स्वतःच्या जाळ्यात अडकला आहे. अनेक ब़ड्या हस्तीसोबत असलेल्या ओळखीच्या अहंकारातून खरात अडकला गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: ज्याच्या एका शब्दावर नाशिकमधील मोठे अधिकारी आणि नेते लोटांगण घालत होते, तो भोंदू अशोक खरात आता स्वतःच्या जाळ्यात अडकला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे प्रकरण काही महिने आधीच उघड झाले असते. मात्र, नाशिक पोलीस दलात असलेल्या खरातच्या भक्त अधिकाऱ्यामुळे हे प्रकरण समोर येण्यास काहीसा उशीर झाल्याची चर्चा आहे. अनेक ब़ड्या हस्तीसोबत असलेल्या ओळखीच्या अहंकारातून खरात अडकला गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बायकोचंही ऐकलं नाही आणि मित्रांनाही जुमानलं नाही; अखेर खरात 'या' एका चुकीमुळे अडकला!
बायकोचंही ऐकलं नाही आणि मित्रांनाही जुमानलं नाही; अखेर खरात 'या' एका चुकीमुळे अडकला!
advertisement

आपल्या मोठ्या ओळखी, कोण काय करणार? मित्रांचा सल्ला अन् पत्नीचा इशारा धुडकावला

काही महिन्यांपूर्वी खरातच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ खुद्द त्याच्याच मोबाईलवर आले होते. हे व्हिडिओ पाहून खरातच्या काही जवळच्या मित्रांनी त्याला सावध केले होते. "विषय वाढवण्यापेक्षा देवाण-घेवाण करून हे प्रकरण येथेच मिटव," असा सल्ला त्याला देण्यात आला होता. इतकेच नाही तर, खरातच्या पत्नीनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेचा आणि मोठ्या दिग्गजांचा वरदहस्त असलेल्या खरातने आपल्या पत्नीलाही सडेतोड सुनावले. "मोठे लोक माझ्या पाठीशी आहेत, मला कोणाची भीती नाही," अशा अविर्भावात त्याने सर्वांचाच सल्ला धुडकावून लावला.

advertisement

पोलीस अधिकारी की खरातचा 'सेवक'?

नाशिक विभागाचा प्रमुख असलेला हा बडा अधिकारी खरातचा आंधळा भक्त होता. खरातच्या मुलीच्या लग्नात एखाद्या घरच्या नोकराप्रमाणे राबणाऱ्या या अधिकाऱ्याने खरातचा मोबाईल आपल्या विश्वासू पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांच्या तांत्रिक विभागाने जेव्हा ते व्हिडिओ 'डीकोड' करून उघडले, तेव्हा त्यातील दृश्ये पाहून स्वतः पोलीसही हादरले. आपल्या 'साहेबांच्या' लाडक्या बाबाचे हे रूप पाहून ते थक्क झाले.

advertisement

जेव्हा त्या अधिकाऱ्याने स्वतः ते व्हिडिओ पाहिले, तेव्हा खरातला बेड्या ठोकण्याऐवजी त्याने सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिला. "हे बाहेर आले तर तुमची मोठी बदनामी होईल, त्यापेक्षा तक्रारदारांवरच खंडणीचा गुन्हा दाखल करू," असा अजब सल्ला या अधिकाऱ्याने दिला. त्यानंतर खरातने आपल्याकडे खंडणी मागितली जात असल्याची तक्रार दाखल केली. ही तक्रारच या प्रकरणात मोठा टर्निंग पॉईंट ठरला असल्याचे सांगण्यात येते. या तक्रारीच्या काही महिन्यातच खरातविरोधातच आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली.

advertisement

इतर संबंधित बातमी:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video
सर्व पहा

'अशोक खरातला जे जे भेटले, त्यांची HIV टेस्ट करा', नाशिकमधील प्रकरणावरून विधानसभेत राडा, नेतेमंडळी अस्वस्थ!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: बायकोचंही ऐकलं नाही आणि मित्रांनाही जुमानलं नाही; अखेर खरात 'या' एका चुकीमुळे अडकला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल