अशोक खरात प्रकरणाशी संबंधितांचा ‘सीडीआर’ आपल्याकडे असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. परंतु, असा ‘सीडीआर’ प्राप्त करून घेण्याचा अधिकार तपास यंत्रणा वगळता कुणालाही नाही. सीडीआर जर अशा प्रकारे कोणाला मिळत असतील तर ते जाणीवपूर्वक देण्यात आले की काय? असा संशय निर्माण होतो. सरकारने या प्रकरणी खुलासा करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यानंतर आज एसआयटीच्या प्रमुखांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की शासन स्तरवार चौकशी होत आहे. चौकशीत जे समोर येईल ते आपल्यासमोर येईल,
advertisement
कुणाकुणाचे डिटेल आले होते समोर?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 फोन कॉल्स झाल्याचा दावा केला होता. त्यांना हा CDR एका अनोळखी व्यक्तीकडून मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत दाखल झालेले गुन्हे
- 1 ते 8 गुन्हे लैंगिक शोषण, जादूटोणा नरबळी, धमकावणे या नुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- 9 आणि 10 वा गुन्हा आर्थिक फसवणूक सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल
- एकूण नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल
- तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहता पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे 2 गुन्हे दाखल
- असे एकूण खरातवर 12 गुन्हे दाखल आहे, त्यात 8 लैंगिक शोषण आणि 4 आर्थिक फसवणुकीचे आहेत.
