TRENDING:

गवतापासून बनवलेल्या खास पाँडिचेरी चटई, 150 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे आहे लोकेशन

Last Updated:

विशेष म्हणजे या चटईंची किंमत केवळ 150 रुपयांपासून सुरू होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठीही त्या सहज परवडणाऱ्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विरार मार्केटमध्ये पाँडिचेरी येथील नैसर्गिक गवतापासून तयार करण्यात आलेल्या चटईंची होलसेल आणि रिटेल विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चटईंची खासियत म्हणजे त्यांचा टिकाऊपणा, आरोग्यदायी गुणधर्म आणि आकर्षक डिझाइन. विशेष म्हणजे या चटईंची किंमत केवळ 150 रुपयांपासून सुरू होत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठीही त्या सहज परवडणाऱ्या आहेत.
advertisement

या चटया पूर्णपणे वॉशेबल असून त्यांची निर्मिती अत्यंत पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने केली जाते. गवत सहा महिने पाण्यात आणि सहा महिने उन्हात ठेवून त्यावर लॅमिनेशन केले जाते, त्यानंतर धाग्याने विणकाम करून चटई तयार केली जाते. त्यामुळे या चटया मजबूत, टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरण्यास योग्य ठरतात.

या चटईंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा 2 in 1 वापर. एका बाजूला मऊ गादीसारखा भाग असून दुसऱ्या बाजूला गवताची चटई असते. त्यामुळे वापरणाऱ्याला दोन्ही प्रकारचा अनुभव मिळतो. विशेषतः ज्यांना पाठीचा, मणक्याचा किंवा सांध्यांचा त्रास आहे, त्यांच्यासाठी या चटया अतिशय उपयुक्त मानल्या जातात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गवतापासून बनवलेल्या खास पाँडिचेरी चटई, 150 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

या चटया हलक्या असल्यामुळे सहज फोल्ड करता येतात आणि कुठेही ने-आण करता येतात. घरात, प्रवासात किंवा बाहेर बसण्यासाठीही त्या उपयोगी पडतात. विविध गरजांनुसार वेगवेगळ्या आकारांमध्ये या चटया उपलब्ध आहेत. आसनासाठी चटई 150 रुपयांना, 5 बाय 6 आकाराची चटई 2800 रुपयांना, तर 3 बाय 18 आकाराची चटई 1800 रुपयांना उपलब्ध आहे. जेवणासाठी बसताना वापरायची चटई 350 रुपयांना मिळते. याशिवाय या चटईंमध्ये 10 ते 12 आकर्षक रंगांचे पर्यायही उपलब्ध आहेत. ग्राहकांना या चटई ऑनलाइन देखील मागवता येतात. इच्छुकांनी 7083021072 या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकतात आणि ऑर्डर देऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गवतापासून बनवलेल्या खास पाँडिचेरी चटई, 150 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे आहे लोकेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल