TRENDING:

अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात? शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचा खळबळजनक दावा

Last Updated:

Ashok Kharat Black Magic Ajit Pawar : अजितदादांच्या घरासमोर कथाकथित जादूटोणा केला गेला होता. त्यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात आहे, अशी शंका यावेळी व्यक्त केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ajit Pawar Devgiri Bungalow Black Magic : नाशिकचा तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली असून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर झालेल्या कथित जादूटोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात आहे. अजितदादांच्या घरासमोर कथाकथित जादूटोणा केला गेला होता. त्यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात आहे, अशी शंका यावेळी व्यक्त केली जात आहे.
Ashok Kharat Black Magic Ajit Pawar
Ashok Kharat Black Magic Ajit Pawar
advertisement

"दादांच्या घराबाहेर जादूटोणा अन्..."

अजित दादा कधी कुठल्या अंगठ्या आणि अशा बाबांवर विश्वास ठेवत नव्हते पण त्यांच्याच पक्षातील लोकं अजित पवारांवर प्रभाव पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील माने यांनी यांनी म्हटलं आहे. अजित दादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे.

advertisement

अशोक खरात याचा सुद्धा यात सहभाग - प्रवक्ते सुनील माने

महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा केला आहे. एसआयटीने यावर देखील कारवाई केली पाहिजे. अजितदादांच्या जवळच्या नेत्यांनी असा प्रकार केला होता. अजितदादांच्या घरासमोर कथाकथित जादूटोणा केला होता, काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात याचा सुद्धा यात सहभाग असल्याचं माने यांनी म्हणलं आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आणला आहे. त्यामुळे नाशिक प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

advertisement

चाकणकरांनी राजीनामा द्यावा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

दरम्यान, रुपाली चाकणकरांनी यावर महिलांची बाजू मांडली पाहिजे, त्यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला पाहिजे. कॅप्टन खरातचं भिंग फुटलंय. आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. अशोक खरात संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या SIT च्या प्रमुखपदी महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात? शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचा खळबळजनक दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल