TRENDING:

खरातच्या मुलीचं लग्न अन् नेत्यांची वरात, राज्यातील बड्या नेत्यांची पत्रिकेत नावं

Last Updated:

लेकीच्या पत्रिकेवर उपमुख्यमंत्री, मंत्री, आयोगाच्या अध्यक्षा, आमदार सगळेच होते. त्यामुळे नेत्यांची त्याचं स्टेटस वाढवलं का हा प्रश्न विचारला जातोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  तुमच्या लग्नात कोण पाहुणे आहेत यावर समाजात आपलं स्टेटस ठरतं असं मानलं जातं. त्यावरून लोक तुमचं स्टेटस ठरवतात हे कटू वास्तव आहे. खराच्या लेकीच्या लग्नातले प्रमुख पाहुण्यांची यादी कुणी वाचून लोकांनी तोंडात बोटं घातली असतील. कारण त्याच्या लेकीच्या पत्रिकेवर उपमुख्यमंत्री, मंत्री, आयोगाच्या अध्यक्षा, आमदार सगळेच होते. त्यामुळे नेत्यांची त्याचं स्टेटस वाढवलं का हा प्रश्न विचारला जातोय.
Ashok Kharat
Ashok Kharat
advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील,आशिष शेलार, दीपक केसरकर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाचा यात समावेश आहे तर ठाकरेंच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकरांच्या नाव प्रमुख पाहुण्यांच्या यादीत आहे.

40 ते 45 राजकीय नेते अशोक खरातच्या नियमित संपर्कात, सूत्रांची माहिती

अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचा उल्लेख आहे. आता याच उल्लेखावरून राजकारण तापलं आहे. राज्यातील 39 आमदार आणि नेत्यांची खरातसोबत उठबस असल्याचा दावा दीपक केसरकरांनी केला होता. पण 40 ते 45 राजकीय नेते अशोक खरातच्या नियमित संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती आहे.

advertisement

निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असत. खरातच्या राजकीय कनेक्शनची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. खरातच्या मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून एसआयटीला दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल मिळाला होता.अशोक खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये नोंदवली आहेत. पोलीस तपासात त्या नावांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

खरातनं राजकीय कनेक्शनचा वापरून आपलं आर्थिक साम्राज्य उभारल्याचा संशय तपास यंत्रणांचा आहे.. खरातची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपत आहे. आता खरातच्या मोबाईल फोनमधून काय माहिती समोर येते याची उत्सुकता आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरातच्या मुलीचं लग्न अन् नेत्यांची वरात, राज्यातील बड्या नेत्यांची पत्रिकेत नावं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल