अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे पत्रही समोर आले आहे. या पत्रात शासनाने आपली बदली केल्याची माहिती अश्विनी भिडे यांना देण्यात आली आहे. यासोबत मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुंबई ब्रिजेश सिंह यांच्या जागी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपण ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरित पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत मेट्रोच्या पदाचा कार्यभारही सांभाळावा, असे आदेश भिडे यांना देण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान याआधी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हा ब्रिजेश सिंग पाहत होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदापासून ब्रिजेश सिंग यांना पदमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिंग यांच्या जागी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे. या आदेशानंतर त्यांना त्वरीत पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
