TRENDING:

बनावट ट्रस्ट स्थापलं, साडेचार कोटी जमा केलं, दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना उचलले

Last Updated:

बीड जिल्ह्यातील चौघांनी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील पत्त्यावर बनावट ट्रस्ट स्थापन करत त्याची वेबसाईट उघडली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. बनावट ट्रस्ट स्थापून साडेचार कोटी जमा करणाऱ्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या.
माजलगाव पोलीस स्टेशन
माजलगाव पोलीस स्टेशन
advertisement

बीड जिल्ह्यातील चौघांनी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील पत्त्यावर बनावट ट्रस्ट स्थापन करत त्याची वेबसाईट उघडली होती. तसेच बँक खाते देखील उघडण्यात आले होते. यासाठीची सर्व कागदपत्रे बनावट होती. ही बाब एटीएसच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणात इम्रान कलीम शेख, मुजम्मिल नूर सय्यद, अहमदुद्दीन केसर काजी आणि तौफिक जावेद काझी या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुजम्मिल नुर सय्यद आणि अहमदुद्दीन कैसर काझी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

advertisement

चौघांनी हा सगळा बनावट प्रकार करत तब्बल साडेचार कोटी रुपये जमा केले होते. त्याचे नेमके काय केले? हे पैसे दहशतवाद पसरवण्यासाठी वापरले का? याबाबतचा तपास एटीएसकडून केला जाणार आहे..

इम्रान कलीम शेख (रा.सदरबाजार, अंबाजोगाई, बीड), मुजम्मील नूर सय्यद (सत्तर गल्ली, पात्रुड, ता.माजलगाव), अहमद्दुदीन कैसर काझी (रोजा मोहल्ला, केज, ता.केज), तौफिक जावेद काझी (मुसा मलबारी चाळ, गावदेवी, डोंग, कामा रोड, दारुस्सलम मस्जिद जवळ, अंधेरी पश्‍चिम, मुंबई) या चौघांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

दहशतवाद विरोधी पथकातील संभाजीनगर युनिटकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ट्रस्ट, एनजीओंची माहिती घेतली जात होती. ही पाहणी करत असताना गुलजार-ए-रजा या ट्रस्टची वेबसाईट आढळून आली होती. तसेच संस्थेचा पत्ता सत्तार गल्ली, पात्रुड, भाटवडगाव, ता. माजलगाव असा आढळून आला. याबाबतची माहिती घेतली असता या संस्थेच्या नावाने पाच खाते आढळून आले होते. हे सर्व खाते दि. 5 सप्टेंबर 2023 मध्ये उघडण्यात आले होते. संस्थेच्या बँकेतील कागदपत्रांची पडताळणी केली असता या पाच अकाऊंटवर चार जण जॉईंट होल्डर असल्याचे समोर आले. तसेच नोंदणी क्रमांक हा बनावट असून तो अहिल्यानगर येथे फैजान ए कन्झुल इमान या संस्थेचा आहे.

advertisement

भारत सरकारच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी देखील केलेली नसतांना त्याचा बनावट क्रमांक नोंदवण्यात आला होता. तसेच ट्रस्टच्या नोंदणीचा देखील बनावट क्रमांक लेटर पॅडवर नोंदवण्यात आलेला आहे. पॅन कार्ड क्रमांक देखील प्रत्यक्षात एक आणि बँकेकडे वेगळाच देण्यात आलेला आहे. तसेच धर्मादाय आयुक्त बीड यांच्याकडे देखील या ट्रस्टची नोंदणी नसल्याचे तपासात समोर आले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ही संधी नका सोडू, थ्री पीस ड्रेस मिळतोय फक्त 500 रुपयांत, मुंबईत इथं करा खरेदी
सर्व पहा

एकूणच बीडमधील या चार जणांनी बनावट कागदपत्र तयार करुन 4 कोटी 73 लाख 67 हजार 503 रुपयांचा निधी जनतेकडून जमवत तो स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाल्याने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करत इम्रान शेख, मुजम्मील नुर सय्यद, अहमदुद्दीन कैसर काझी व तौफि क जावेद काझी या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जाणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बनावट ट्रस्ट स्थापलं, साडेचार कोटी जमा केलं, दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना उचलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल