पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कुलस्वामी मंगल कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताच्या नकाशावर थ्रीडी अशी रांगोळी काढण्यात आलेली होती.12 फुट एवढी रांगोळी वरती प्रतिमा तयार केलेली आहे. तीन कलाकारांनी मिळून ही रांगोळी या काढलेली आहे. याकरता आठ दिवस एवढा कालावधी लागला आहे. त्यासोबतच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आरती देखील करण्यात आलेली आहे. आणि प्रार्थना वेगळी करण्यात आलेली आहे.
advertisement
तसेच भारताच्या नकाशावर जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थ्रीडी रांगोळी काढलेली होती त्याला पुष्पवृष्टी देखील केलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यासोबतच त्यांना दीर्घायुष्य लाभो याकरता आम्ही हा कार्यक्रमाचा आयोजन केलं होतं आणि त्यांच्या दीर्घायुष्य लाभावी याकरता देवीसमोर अर्थ देखील केलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे असं कुलस्वामीचे प्रतिष्ठानचे विलास कोरडे म्हणाले आहेत.