दुर्राणी यांनी सांगितली INSIDE STORY:
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी झाल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी आपण अजित पवारांसोबत का गेलो? शरद पवारांची साथ का सोडावी लागली? याचा उलगडा केला आहे. 'कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता' अशी शायरी म्हणत बाबाजानी दुर्राणींनी अंतर्गत स्टोरी सांगितली. "मी शरद पवार यांच्या सोबत 1985 पासून आहे. राष्ट्रवादीच्या पायाभरणीमध्ये मी होतो. पक्षफुटीनंतर दोन महिने होतो, नंतर त्यांच्याकडे गेलो. पण मला शून्य व्हायचं नव्हतं. साहेब म्हणून मी परत आलो. माझी अशी इच्छा आहे साहेब सत्ता परिवर्तन होईपर्यंत हयात रहा. माझ्या आयुष्यात जे काही मिळाले ते साहेबांमुळे." असं म्हणत दुर्राणी यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
advertisement
आणखी कोण देणार शरद पवारांना साथ?
राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील भाषणात बोलताना शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. "पक्षात येण्याची काही जणांची इच्छा आहे, मात्र पक्षात घ्यायचं की नाही हे नेते बसून ठरवतील. सरसकट प्रवेश नको अशी भूमिका आहे" असं शरद पवार म्हणाले. दरम्यान यापूर्वी देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना धक्के दिले आहेत. आज देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आले आहेत. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असून आणखी किती नेते अजित पवार यांची साथ सोडणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
'पक्षात येण्यासाठी काही जणांची इच्छा', शरद पवारांनी टाकला बॉम्ब, दादांची साथ कोण सोडणार?
विधानसभेच्या तोंडावर दादांना टेन्शन:
बंडाच्या वेळी अजित पवारांसोबत दिसणारे बरेच नेते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा आले आहेत. त्यामध्ये सध्याचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार बाबाजानी दुर्राणीं या बड्या नेत्यांना दादांची साथ सोडली आहे. ही गळती अशीच सुरू राहिल्यास विधानसभा निवडणुकीत दादांचं टेन्शन चांगलंच वाढणार आहे.
